रश्मी शुक्लांना मोठा दिलासा अन् देशमुखांवर टांगती तलवार

गुन्हा रद्द करण्यासाठी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनीही न्यायालयात धाव घेतली आहे.
IPS Rashmi shukla not to be arrested high court gives relief
IPS Rashmi shukla not to be arrested high court gives relief

मुंबई : राज्य गुप्तचर विभागाच्या तक्रारीवरून मुंबईच्या सायबर पोलिसांनी फोन टॅपिंग (Phone Tapping) अहवाल लीक केल्याप्रकरणी अज्ञातांविरोधात विविध कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे. याच गुन्ह्याच्या अनुषंगाने जबाब नोंदविण्यासाठी गुप्तवार्ता विभागाच्या तत्कालीन आयुक्त रश्मी शुक्ला (Rashmi Shukla) यांना सायबर पोलिसानी समन्स पाठवले आहे. पण कोरोना महामारीचे कारण देत त्यांनी चौकशीला नकार कळवला आहे. तसेच कारवाई टाळण्यासाठी त्यांनी न्यायालयात धाव घेतली आहे. (IPS Rashmi shukla not to be arrested high court gives relief)

सीबीआयने दाखल केलेला गुन्हा रद्द करण्यासाठी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनीही न्यायालयात धाव घेतली आहे. पण न्यायालयाने सीबीआयला त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यापासून दिलासा दिला नाही. शुक्ला यांच्या याचिकेवर आज मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी झाली. राज्य शासनाच्या वतीने दरायस खंबाटा यांनी शुक्ला यांना अटक करणार नाही, अशी हमी न्यायालयात दिली. शुल्का यांचा जबाब नोंदविण्यासाठी पोलिस हैदराबादमध्ये जातील. त्यांच्या जबाबाचे व्हिडिओ रेकॅार्डिंगही केले जाईल, असे खंबाटा यांनी न्यायालयात सांगितले. त्यावर शुल्का यांचे वकील महेश जेठमलानी यांनीही हरकत घेतली नाही. त्यामुळे न्यायालयाने सुनावणी तहकुब करत शुल्का यांना दिलासा दिला. 

राज्य शासनाने अटक न करण्याची हमी दिल्याने पुढील सुनावणीपर्यंत शुक्ला यांना दिलासा मिळाला आहे. या कालावधीत पोलिसांचे पथक जबाब नोंदविण्यासाठी हैदराबादला जाऊ शकते. या प्रकरणात शुक्ला यांचा जबाब महत्वाचा मानला जात आहे. त्यामुळे त्या काय जबाब देतात, याकडे लक्ष लागले आहे. 

दरम्यान, सायबर पोलिसांनी रश्मी शुक्ला यांना दोन समन्स पाठवले होते. मात्र, फोन टॅपिंग प्रकरणाचा अहवाल लीक केल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यांमध्ये मुंबई पोलिसांनी बेकायदेशीर रित्या समन्स पाठले असल्याचा आरोप रश्मी शुक्ला यांनी केला आहे. या आरोपा विरोधात शुक्ला यांनी हैद्राबाद कोर्टात धाव घेत याचिका दाखल केली आहे.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी काही दिवसापूर्वी तत्कालीन गुप्तवार्ता विभागाच्या आयुक्त रश्मी शुक्ला यांच्या बदल्यांच्या रॅकेटच्या अहवालावरून राज्य सरकारवर टिकास्त्र सोडले होते. हा अहवाल केंद्रीय गृहसचिवांकडे देणार असल्याचेही फडणवीस यांनी सांगितले होते. फोन टॅपिंग प्रकरणाने राज्याच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली होती. याप्रकरणी २७ मार्च रोजी राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी आपला अहवाल मुख्यमंत्र्यांना सादर केला होता. 

मुंबईतील सायबर पोलिस स्थानकामध्ये दाखल करण्यात आलेल्या एफआयआरसंदर्भात हे समन्स बजावण्यात आले आहे. हे फोन टॅपिंग प्रकरण घडलं तेव्हा शुक्ला या गुप्तचर विभागाच्या प्रमुख होत्या. त्या संदर्भात त्यांची चौकशी करण्यासाठी पोलिसांनी त्यांना समन्स बजावले आहे. 

Edited By Rajanand More

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com