जिल्हाधिकारी, पोलिस आयुक्त रस्त्यावर; २६ दुकांनाना सील, सव्वा लाखांचा दंड वसुल..

जिल्ह्यातील कोरोना परिस्थीती आटोक्यात येत असली तरी, संभाव्य तिसरी लाट व अन्य संसर्गजन्य आजारांचा धोका लक्षात घेता सतर्कता बाळगणे गरजेचे आहे.
Collector, Commissioner on the street news Auragabad
Collector, Commissioner on the street news Auragabad

औरंगाबाद :  कोरोना  विषाणूचा प्रादूर्भाव रोखण्या करीता राज्य शासनाने ब्रेक द चेन अंतर्गत अनेक नियम घालुन दिले आहेत. परंतु जिल्ह्यात अनेक ठिकाणी दुकाने व आस्थापना ह्या नियमांचे पालन करत नसल्याचे निदर्शनास आले आहे. (Collector, Commissioner of Police on the street; 26 shops sealed, fine of Rs.1.25 Lac) या पार्श्वभूमीवर आज जिल्हाधिकारी सुनील चव्हाण आणि पोलिस आयुक्त डॉ. निखील गुप्ता यांनी दिवसभर संयुक्तपणे मोहिम राबत २६ दुकांनावर दंडात्मक कारवाई केली. या दुकान मालकांकडून सव्वा लाखांचा दंडही वसुल करण्यात आला.

जिल्ह्यातील कोरोना परिस्थीती आटोक्यात येत असली तरी, संभाव्य तिसरी लाट व अन्य संसर्गजन्य आजारांचा धोका लक्षात घेता सतर्कता बाळगणे गरजेचे आहे. जिल्हा प्रशासन, पोलीस, आरोग्य विभाग आपापल्या परीने या परिस्थितीशी लढा देत आहे. (There are still some merchants, small and big shopkeepers, doing business in a clandestine way.) मात्र अजूनही काही व्यापारी, छोटे-मोठे दुकानदार छुप्या मार्गाने आपले व्यवहार सुरू ठेवत आहेत. या पार्श्वभूमीवर आज सकाळी नऊ वाजेपासूनच जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्त, उपजिल्हाधिकारी, कामगार उप आयुक्त, महानगरपालीका व महसुल अधिकारी यांची बैठक झाली.

या बैठकीत उपजिल्हाधिकारी यांच्या देखरेखीखाली विशेष भरारी पथके तयार करुन दुकाने व आस्थापना ( अत्यावश्यक सेवेतील आस्थापना वगळून) चालू राहणार नाही याची खबरदारी घेऊन त्यावर कार्यवाही करण्यासाठीच्या सुचना देण्यात आल्या होत्या. बैठकीनंतर स्वत: जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, पोलिस आयुक्त डॉ. निखील गुप्ता यांनी शहरातील शहागंज, किराडपुरा, जालना रोड अशा अनेक ठिकाणी पाहणी करुन नियमांची अंमलबजावणी न करणाऱ्या दुकानांवर आणि आस्थापनांवर धडक कारवाई केली. 

विशेष भरारी पथकाने सकाळी साडेनऊ  ते दुपारी एक वाजेपर्यंत आपापल्या कार्यक्षेत्रात गस्त घालुन २६ दुकांनवर कारवाई करत त्यांच्याकडून दंड वसुल केला. यात राज क्लॉथ् स्टोअर्स, गजानन गिफ्ट ॲन्ड टॉईज, शिवानी ज्वेलर्स. हार्डवेअर कलेक्शन, हिल्स लाईट ॲन्ड इलेक्ट्रीकल्स, जीवन तायडे फोटो लॅब, सुनील पांडे फोटो लॅब, सुभाष जैन फोटो लॅब, प्रॉमीस स्टेशनरी, कसबेकर झेरॉक्स ॲन्ड स्टेशनरी, गणेश दुध् डेअरी, रत्नागिरी मँगो हाऊस, कृष्णाई केक ॲन्ड डेली निडस, अशोका इंटरप्रायजेस मल्टी सर्व्हिसेस, बालाजी इलेक्ट्रीकल्स, सार्थक भुजंगराव वाघ शेगाव कचोरी सेंटर, प्रमोद कांतीलाल जैन महाविर मार्टस, संतोष नामदेव म्हस्के सहारा मल्टी सर्वीसेस, नृसिंह युनिफॉर्म शुटींग शर्टींग सेंट, ओम कलेक्शन, तिरुमला साडी सेंटर. महावीर ज्वेलर्स, आनंद इलेक्ट्रीकल्स, चिंतामणी ॲल्युमिनीअम ॲन्ड ग्लास, जुवेरिया क्रॉकरी कलेक्शन, रमजान भाई प्लॉटींग ऑफीस यांचा समावेश आहे. 

या शिवाय अन्न व औषधी प्रशासनाने संस्कृती फास्ट फुड सेंटर, हर्ष मेडिकल  या  आस्थापनेस कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव संपेपर्यंत अन्न पदार्थ विक्री करण्यास प्रतिबंध केलेला आहे. राज्य शासनाने कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर वेळोवेळी दिलेल्या नियमावलीचा भंग केल्याप्रकरणी १६ आस्थापना मालकाकडुन १ लाख २५ हजार इतका दंड वसुल केला आहे.

Edited By : Jagdish Pansare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com