तौक्ते वादळापेक्षा जास्त वेगाने मुख्यमंत्री आले आणि गेले....

चिवला गावात एकही झाड पडलेले नाही. तेथे राज्याचा मुख्यमंत्री जातो. ज्या वायरी, निवती, देवगडमध्ये लोकांचे संसार उध्दवस्त झाले आहेत. तेथे मुख्यमंत्री येतील आणि आम्हाला काही तरी मदत देतील, अशा आशेने लोक वाट पहात बसले होते. उलट याकडे दूर्लक्ष करून त्यांनी आमच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम केले आहे.
तौक्ते वादळापेक्षा जास्त वेगाने मुख्यमंत्री आले आणि गेले....
The Chief Minister came and went faster than a Tauktae cyclone...

सिंधुदुर्ग : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Udhav Thackeray) यांनी नुकसानग्रस्तांची निराशा केली, तौक्ते चक्री वादळापेक्षा जास्त वेगाने आले आणि निघून गेले अशी टीका आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी केली.(Tauktae cyclone) चिवला बीचला (Chivla Beach) एक झाड पडलेलं नाही. त्या ठिकाणी मुख्यमंत्री यांनी पाहणी केली. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) सिंधुदुर्गात आल्याने अहंकार जागा झाल्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोकणात पहाणीसाठी आले, अशी टीकाही त्यांनी केली. (The Chief Minister came and went faster than a Tauktae cyclone...)

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोकणचा पहाणी दौरा केला. या दौऱ्यावर आमदार नितेश राणे यांनी सडेतोड टीका केली. ते म्हणाले, याला दौरा कसा म्हणणार ते सांगा. मुख्यमंत्री दौऱ्यावर जातो, त्यावेळी सामान्य जनतेला आपले मायबाप सरकार येते आहे. त्यावेळी आम्हाला काही तरी मिळणार अशी अपेक्षा असते. तौक्ते वादळ ज्यावेगाने आले, त्यापेक्षा जास्त वेगाने मुख्यमंत्री आले आणि निघून गेले.

मुख्यमंत्र्यांना येण्याची गरज होती का. आपल्या पुढच्याची घडी खराब करण्याची गरज होती का. याचे सगळे श्रेय फडणवीसांना जाईल म्हणून त्यांनी दौरा केला. त्यांचा अहंकार जागा झाला नसता तर ते येथे पोहोचलेच नसते. चिवला गावात एकही झाड पडलेले नाही. तेथे राज्याचा मुख्यमंत्री जातो. ज्या वायरी, निवती, देवगडमध्ये लोकांचे संसार उध्दवस्त झाले आहेत. तेथे मुख्यमंत्री येतील आणि आम्हाला काही तरी मदत देतील, अशा आशेने लोक वाट पहात बसले होते. उलट याकडे दूर्लक्ष करून त्यांनी आमच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम केले आहे.

मुख्यमंत्र्यांनी चिपी विमानतळावर आढावा बैठक घेतली, याबाबत विचारले असता आमदार नितेश राणे म्हणाले, आम्ही काही मुद्दे जिल्हाधिकाऱ्यांना सुचविले होते. पंचनामे सुरू असून ते कोणत्या पध्दतीने होत आहेत हे पाहिले पाहिजे. ज्यांचे पाच लाखांचे नुकसान झालंय त्यांना दोन लाख लावले जात आहेत. मच्छिमारांचे ५० लाखांच्या बोटींचे नुकसान झालयं. त्यांना २० लाख लावले जात आहेत. अशांनी त्यांचे संसार उभे राहणार आहेत का, असा प्रश्न नितेश राणे यांनी उपस्थित केला आहे. 

गेल्या वर्षीच्या निसर्ग वादळाची एक दमडीही अजून आलेली नाही. आठ कोटी मागीतले केवळ ४९ लाख दिले आहेत. गेल्यावर्षीचा बॉकलाग भरलेला नाही. या वर्षी काय देणार ते त्यांनी नेमके सांगायला हवे. म्हणतात, दोन दिवसांनंतर देणार मग आला कशाला तुम्ही असा प्रश्नही आमदार राणे यांनी उपस्थित केला आहे. सगळ्या बाबतीत केंद्राकडे बोट दाखवायचे असेल तर अधिकच्यासाठी नवरी सुध्दा केंद्राकडूनच मागा, तुमचे स्वतःचे अस्तित्व आहे का ते तरी सांगा, अशी खिल्लीही त्यांनी उडवली.
  
खासदार म्हणाले, ६५ कोटींपेक्षा जास्त नुकसान झाले असून आम्ही १०० कोटींपेक्षा जास्त मदत देणार आहोत, याविषयी विचारले असता नितेश राणे म्हणाले, खासदार विनायक राऊत नको, अधिकारी आमचे काम करत आहेत. सत्ताधारी पक्षाचे खासदार आहाता. उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय असून त्यांच्या घरात चहा उचलण्याचे काम करता. तुम्ही नेमके मदत काय देणार हे सांगायला हवे. तुम्हाला दोन दोन वेळा लोकांनी निवडून दिले आहे.

मतदार रत्नागिरीचा असो, सिंधुदूर्ग असो, देवगड असो तो हवालदिल आहे. मदतीचे आकडे देण्यापेक्षा ते काम आमचे विरोधी पक्षांचे आहे. आमचे देवेंद्र फडणवीस येथे आले व ते वाडी वस्त्यांवर, बागेत गेले. नुकसानीची प्रत्यक्ष पहाणी केली. सरकारला जागे करण्याचे काम विरोधी पक्षाचे आहे. हेच आम्हाला आकडे सांगायला लागले तर आम्ही जायचे कोणाकडे, असा प्रश्नही
त्यांनी उपस्थित केला. 

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in