भाजपा प्रदेश सचिवपदी अरविंद पाटील निलंगेकरांची वर्णी..

नियोजनबद्ध आखणी करत यंत्रणा हातळल्यामुळे पक्षाला जिल्ह्यात स्थानिक स्वराज संस्था व विधानसभा,लोकसभा निवडणुकीत अरविंद निलंगेकर यांची देखील महत्वाची भूमिका होती.
Latur Bjp Political News
Latur Bjp Political News

निलंगा : भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी प्रदेश सचिव पदी युवा नेते अरविंद पाटील निलंगेकर यांची नियुक्ती केली आहे. या संदर्भातील पत्र नुकतेच देण्यात आले असून ते माजी मंत्री तथा निलंग्याचे विद्यमान आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांचे बंधू आहेत. (Character of Arvind Patil Nilangekar as BJP State Secretary) अरविंद पाटील निलंगेकर यांच्या संघटन कौशल्याचा विचार करून त्यांच्याकडे राज्यातील शक्ती केद्र व बुध रचनेची विशेष जवाबदारी सोपवण्यात आल्याचे बोलले जाते.

लातूर जिल्ह्यात अरविंद पाटील निलंगेकर हे  वीस वर्षापासून भाजपमध्ये कार्यरत असून पक्षाचे संघटन वाढवण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले आहेत. (Latur Bjp)  जिल्ह्यतील ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हापरिषद या स्थानिक स्वराज्य संस्थासह विधानसभा व लोकसभा निवडणूकी दरम्यान पक्षाला विजय मिळवून देण्यासाठी बूथ पातळीवर काम केले.

नियोजनबद्ध आखणी करत यंत्रणा हातळल्यामुळे पक्षाला जिल्ह्यात स्थानिक स्वराज संस्था व विधानसभा,लोकसभा निवडणुकीत अरविंद निलंगेकर यांची देखील महत्वाची भूमिका होती. (Bjp Mla Sambhaji Patil Nilangekar) २०१९ च्या लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर तत्कालीन भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष व देशाचे गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत लातूरमध्ये घेण्यात आलेल्या बुथ प्रमुखांच्या मेळाव्याच्या नियोजनाचे कौतुक झाले होते.

अरविंद पाटील निलंगेकर यांच्या या कामची दखल घेवून प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी त्यांना प्रदेश सचिव म्हणून नियुक्त केल्याचे सांगितले जाते. नियुक्तीचे पत्र देतांना अरविंद पाटील निलंगेकर यांच्याकडे महाराष्ट्रातील शक्तीकेंद्र व बुथ रचनेची विशेष जवाबदारी देण्यात आली आहे.

या निवडीबद्दल प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, यांच्यासह पक्षश्रेष्ठीचे अरविंद पाटील निलंगेकर यांनी आभार व्यक्त करत पक्षश्रेष्ठीनी आपल्यावर जो विश्वास दाखवला तो सार्थ ठरवण्याची ग्वाही त्यांनी दिली आहे. महाराष्ट्रात सशक्त शक्तीकेंद्र व समर्थ बुथ ही संकल्पना राबविण्यासाठी पूर्णपणे योगदान देत त्यासाठी परिश्रम घेऊ, असा विश्वास देखील निलंगेकर यांनी पक्षश्रेष्ठींना दिला आहे. 

Edited By : Jagdish Pansare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com