शरद पवारांच्या बैठकीला शिवसेनेला निमंत्रण नाही; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

देशातील विरोधी पक्षातील नेत्यांची बैठक पवारांच्या दिल्लीतील निवास्थानी होणार आहे.
  Uddhav Thackeray, Sharad Pawar .jpg
Uddhav Thackeray, Sharad Pawar .jpg

नवी दिल्ली  : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) दिल्लीत दाखल झाल्यानंतर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. सोमवारी त्यांनी राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर यांची भेट घेतली होती. त्यानंतर त्यांनी आज मंगळवारी देशातील विरोधी पक्षातील नेत्यांची बैठक पवारांच्या दिल्लीतील निवास्थानी होणार आहे. मात्र, या बैठकीला शिवसेनेला (ShivSena) निमंत्रण नसल्याने राजकीय वर्तुळात विविध चर्चा रंगल्या आहेत. (ShivSena is not invited to Sharad Pawar's meeting)
 
शरद पवार व तृणमूल काँग्रेसचे नेते यशवंत सिन्हा (Yashwant Sinha) यांच्या माध्यमातून विरोधी पक्षांची बैठक बोलावण्यात आली आहे. सिन्हा यांनी स्थापन केलेल्या राष्ट्र मंचमार्फत ही बैठक होत आहे. पवारांच्या दिल्लीतील निवासस्थानी दुपारी चार वाजता ही बैठक होणार आहे. या बैठकीला आप, तृणमूल काँग्रेस, समाजवादी पक्ष यांसह विविध 15 पक्षांचे नेते उपस्थित राहणार आहेत.  मात्र, यामध्ये शिवसेनेचे प्रतिनिधी उपस्थित राहणार नसल्याचे आचर्य व्यक्त केले जात आहे. 

त्यामुळे या बैठकीवर संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. या बैठकीत तिसऱ्या आघाडीवर चर्चा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. बिगर भाजप व बिगर काँग्रेस पक्षांच्या नेत्यांचा या बैठकीत सहभाग असल्याची माहिती पुढे येत आहे. शरद पवार यांच्या निवासस्थानी राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय कार्यसमितीची  बैठक होणार आहे. देशाच्या आणि महाराष्ट्राच्या राजकीय परिस्थीवर या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे.  

पवारांच्या निवास्थानी होणाऱ्या विरोधी पक्षच्या बैठकीत शिवसेनेला निमंत्रण नाही. शिवसेनेच्या नेत्याचे नाव निमंत्रितांच्या यादीत नाही. राष्ट्रवादीचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी निमंत्रितांची यादी जाहीर केली होती. मलिक यांनी जाहीर केलेल्या यादीत शिवसेनेला स्थानचे नाव नाही. 

यावर बोलताना शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) म्हणाले की, पवारांनी जी बैठक बोलवली आहे, ही विरोधीपक्षांची नाही तर यशवंत सिन्हा यांच्या राष्ट्र मंचची आहे. देशात एक प्रबळ विरोधी पक्षासाठी कुणी प्रयत्न करत असेल तर त्यात चूक काय आहे, असा सवाल त्यांनी केला. ही भाजपविरोधी किंवा युपीएविरोधी बैठक आहे असे कुणीही म्हटले नाही, असेही राऊत यांनी सांगितले.

Edited By - Amol Jaybhaye  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com