भाजप खासदार डाॅ. भागवत कराड यांना पितृशोक

किशनराव कराड यांनी अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत डाॅ. कराड, मुलगी डाॅ. उज्वला दहिफळे यांना शिक्षण देऊन डाॅक्टर बनवले.
Bjp Leader Mp Dr. karads Father dies News Aurangabad.
Bjp Leader Mp Dr. karads Father dies News Aurangabad.

औरंगाबाद ः भाजपचे राज्यसभेतील खासदार तथा प्रदेश उपाध्यक्ष डाॅ. भागवत कराड यांचे वडिल किशनराव पांडुरंग कराड यांचे आज वृद्धापकाळाने निधन झाले. (BJP MP Dr. Bhagwat Karad's father dies) कोटला काॅलनी येथील राहत्या घरी वयाच्या ९७ व्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालवली.

 लातूर जिल्ह्यातील अहमदपूर तालुक्यातील चिखली हे कराड यांचे मुळ गाव. (Karad's native village is Chikhli in Ahmedpur taluka of Latur district.) शेतकरी असलेल्या  किशनराव कराड यांनी अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत डाॅ. कराड, मुलगी डाॅ. उज्वला दहिफळे यांना शिक्षण देऊन डाॅक्टर बनवले. आज हे दोघेही आपापल्या क्षेत्रात प्रगती करत आहेत.

किशनराव कराड हे  अनेक वर्षांपासून औरंगाबाद येथे डाॅ. कराड यांच्याकडेच राहत होते. आज अचानक प्रकृती बिघडली आणि  त्यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर पुष्पनगरी स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या पश्चात १ मुलगा, २ मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे.

Edited By : Jagdish Pansare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com