भारताला कोरोनासोबतच काँग्रेस नामक व्हायरसशी लढावे लागत आहे; भाजप नेत्याची घसरली जीभ 

काँग्रेसने कोरोना लसीकरणासंदर्भात एक भ्रम पसरविणारे फलक लावले आहेत. त्या फलकांचा आम्ही निषेध करतो.
 Sanjay Pandey .jpg
Sanjay Pandey .jpg

मुंबई : भारताला कोरोनाशी लढत असताना काँग्रेस (Congress) नामक व्हायरसशी सुद्धा लढावे लागत, असल्याचे भाजपचे (Bjp) महाराष्ट्र उत्तर भारतीय मोर्चाचे अध्यक्ष संजय पांडे (Sanjay Pandey) यांनी म्हटले आहे. मुंबईमध्ये काँग्रेसने ''मोदी जी, हमारे बच्चों की वैक्सीन विदेश क्यों भेज दिया?'' असे फलक लावले आहेत, त्यावरुन पांडे यांनी काँग्रेसवर निशाणा साधला आहे. (BJP leader criticizes Congress)

पांडे म्हणाले की, कोरोना महामारीशी संपुर्ण जग लढत आहे. अशामध्ये सर्व देश एकमेकांची मदत करत आहेत. जेव्हा भारताला गरज पडली तेव्हा ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटर व रेमडेसिव्हिर इंजेक्शनची इतर देशांनी भारताला मदत दिली. लसीसाठी लागणारा कच्चा माल हा परदेशातून आयात करावा लागतो. त्यामुळे आपण इतर देशांकडून काही घेतो तर त्यांना सुद्धा आपल्याला मदत द्यावी लागते. तो एक आंतरराष्ट्री संबंधांचा भाग आहे. 

अशामध्ये काँग्रेसने कोरोना लसीकरणासंदर्भात एक भ्रम पसरविणारे फलक लावले आहेत. त्या फलकांचा आम्ही निषेध करतो, तो फक्त आणि फक्त भारताची प्रतिमा आंतरराष्ट्रीय पातळीवर मलिन करण्याचा आणि देशात भ्रम पसरविण्याचा प्रयत्न असल्याचे पांडे म्हणाले. हे फलक लावणाऱ्यांवर साथरोग नियमंत्र कायद्या अंतर्गत कठोर कारवाई करावी, अशी मागणी पांडे यांनी राज्य सरकारकडे केली आहे. 

दरम्यान, देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने थैमन घाले आहे. त्यातच आता तिसरी लाट येणार असल्याचे केंद्र सरकारच्या तीन सदस्यांच्या शास्त्रज्ञांच्या पॅनेलने म्हटले आहे. देशातील कोरोनाची दुसरी लाट जुलै महिन्यानंतर ओसरेल, असे सांगण्यात आले आहे. तर तिसरी लाट येणार असून ती सहा ते आठ महिन्यांनी येईल, असेही स्पष्ट करण्यात आले आहे. 

पण तिसरी लाट अधिक तीव्र नसेल, असेही त्यांनी सांगितले. त्यासाठी लसीकरण हे एकमेव कारण असल्याचेही त्यांनी नमूद केले आहे. शास्त्रज्ञांनी वापरलेल्या मॅाडेलनुसार देशात मे अखेरीस नवी रुग्णांची दैनंदिन संख्या दीड लाखांपर्यंत खाली येईल. तर जुन महिनाअखेरीस हा आकडा २० हजार एवढा असेल. तिसरी लाट रोखण्यासाठी लसीकरण हाच उपाय असल्याचे शास्त्रज्ञांनी म्हटले आहे. मात्र, सध्या देशात अनेक राज्यात लसीकरणाचा तुटवडा आहे. लसीअभावी अनेक केंद्र बंद पडली आहेत. केंद्र सरकारने इतर देशांना लस दिल्यामुळे देशात लसीचा तुटवडा निर्माण झाला असल्याचे काँग्रेसने म्हटले आहे. 

Edited By - Amol Jaybhaye
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com