पंकजा मुंडे अध्यक्ष असलेल्या वैद्यनाथ कारखान्याचे बॅंक खाते जप्त..

औरंगाबाद येथील भविष्य निर्वाह निधी विभागीय कार्यालयाचे सहायक आयुक्त आदित्य तलवारे यांच्या आदेशाने ही कारवाई करण्यात आली.
Bjp Leader pankaja munde  news beed
Bjp Leader pankaja munde news beed

औरंगाबाद ः भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे अध्यक्ष असलेल्या परळी येथील पांगरीच्या वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याचे बॅंक खाते जप्त करण्यात आले आहे. औरंगाबाद येथील कर्मचारी भविष्य निर्वाह निधीच्या विभागीय कार्यालयातर्फे हे खाते जप्त करण्यात आले आहे. (Bank account of Vaidyanath factory headed by Pankaja Munde seized ) दोन वर्ष कारखान्यातील कर्मचाऱ्यांचा तब्बल १ कोटी ४६ लाख रुपयांचा भविष्य निर्वाह निधी न भरल्यामुळे ही करवाई करण्यात आली.

पैकी कारखान्याच्या जप्त करण्यात आलेल्या बॅंक खात्यातून ९२ लाखांची वसुली करण्यात आली आहे. पंकजा मुंडे अध्यक्ष असलेला वैद्यनाथ सहकारी साखर कारखाना सध्या अडचणीत सापडला आहे. (Bjp Leader Pankaja Munde, Beed) कर्मचाऱ्यांचे पगार नाही, कारखान्यातील लाखोंच्या साहित्याची चोरी यामुळे मध्यतंरीच्या काळात कारखाना चांगलाच चर्चेत आला होता.

आता  आॅगस्ट २०१८ ते २०१९ दरम्यानचा कारखान्यातील कर्मचारी, कामगारांचा १ कोटी ४६ लाख रुपयांचा भविष्य निर्वाह निधी थकीत असल्याने बॅंक खाते जप्तीच्या कारवाईची नामुष्की कारखान्यावर ओढावली आहे. ( Vaidyanath Sugaer Factory, pangri,Parli district Beed)

औरंगाबाद येथील भविष्य निर्वाह निधी विभागीय कार्यालयाचे सहायक आयुक्त आदित्य तलवारे यांच्या आदेशाने ही कारवाई करण्यात आली. या कारवाईतून ९२ लाखांची वसुली करण्यात आली असून उर्वरित ५६ लाखांच्या वसुलीसाठी देखील प्रक्रिया सुरु असल्याचे सांगितले जाते.

Edited By : Jagdish Pansare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com