पंजाबचा 'कॅप्टन' कोण? वाद पोचला थेट सोनियांच्या दरबारी - navjot singh sidhu will meet congress party chief sonia gandhi today | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोल्हापुरात दाखल..पुरग्रस्त भागाची पाहणी
पुणेकरांना खुशखबर : पुणे मेट्रोची शुक्रवारी सकाळी ७ वाजता ट्रायल रन...पालकमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत कोथरुड डेपो ते आयडीयल कॉलनीदरम्यान ट्रायल

पंजाबचा 'कॅप्टन' कोण? वाद पोचला थेट सोनियांच्या दरबारी

वृत्तसंस्था
शुक्रवार, 16 जुलै 2021

पंजाब काँगेसमधील संघर्षावर हाय कमांडने शोधलेला तोडगा तकलादू ठरला आहे. यामुळे सिद्धू हे सोनिया गांधींची आज भेट घेणार आहेत. 

नवी दिल्ली : पंजाब (Punjab)  काँगेसमधील (Congress) संघर्षावर हाय कमांडने शोधलेला तोडगा तकलादू ठरला आहे. काँग्रेस नेते नवज्योतसिंग सिद्धू (Navjyot Singh Sidhu)  यांच्यावर प्रदेशाध्यक्षपदाची धुरा सोपवण्यात येणार आहे. मात्र, मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदरसिंग (Amarinder Singh) यांनी याला विरोध केला आहे. यामुळे हा वाद आता थेट पक्षाच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांची दरबारी गेला असून, सिद्धू आज त्यांची भेट घेणार आहेत. 

सिद्धू यांना प्रदेशाध्यक्षपद देण्याच्या निर्णयाने कॅप्टन नाराज झाले आहेत. त्यांनी याबद्दल पक्ष नेतृत्वाकडे तक्रार केली आहे. हा वाद आता थेट सोनिया गांधींकडे गेला आहे. सिद्धू हे आज सोनिया गांधींची भेट घेतली होती. कॅप्टन यांनीही नुकतीच त्यांची भेट घेतली होती. त्यावेळी त्यांनी पक्षाच्या अध्यक्षा सांगतील तो तोडगा मान्य असेल, असे म्हटले होते. आता सोनिया जो निर्णय घेतील तो सिद्धू आणि कॅप्टन यांना मान्य करावा लागेल, अशी माहिती सूत्रांनी दिली. 

पंजाबमधील अंतर्गत वाद विधानसभा निवडणुकीआधी पक्षाला परवडणारा नसल्याने नेतृत्वाने पावले उचलण्यास सुरवात केली आहे. सिद्धू यांनी प्रदेशाध्यक्षपद मागितले होते. पक्षाने मात्र, त्यांना प्रचारप्रमुखाची जबाबदारी देण्याची तयारी दर्शविली होती. सिद्धू हे प्रदेशाध्यक्षपदावर ठाम होते. अखेर सिद्धू यांची मागणी पक्षाच्या नेतृत्वाने मान्य केली आहे. विद्यमान प्रदेशाध्यक्ष सुनील जाखड यांना हटलवे जाईल. सिद्धू यांच्यासोबत दोन कार्यकारी अध्यक्ष दिले जातील. यातील एक दलित आणि एक हिंदू असेल, अशी माहिती सूत्रांनी दिली. 

मुख्यमंत्री अमरिंदरसिंग आणि नवज्योतसिंग सिद्धू यांच्यात मागील काही दिवसांपासून वाद सुरू आहे. सिद्धू यांनी 30 जूनला प्रियांका गांधी यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली होती.  त्यानंतर राहुल गांधी आणि सिद्धू यांची भेट झाली होती. दरम्यान, मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदरसिंग यांनी पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधींची नुकतीच भेट घेतली होती. पुढील वर्षी पंजाबमध्ये विधानसभा निवडणूक होत आहे. यामुळे त्याआधी पक्षांतर्गत वाद मिटवण्यासाठी ही भेट होती. राज्यात काँग्रेसचे नेतृत्व अमरिंदर करतील हे आधीच स्पष्ट करण्यात आले आहे. पंजाबमध्ये काँग्रेसमधील संघर्ष वाढू लागल्याने दिवसेंदिवस नेतृत्वाची डोकेदुखी वाढू लागली होती. या पार्श्वभूमीवर अमरिंदरसिंग यांनी सोनिया गांधींची घेतलेली भेट महत्वूपर्ण मानली जात होती. 

हेही वाचा : काँग्रेसमधील संघर्ष चिघळला..मुख्यमंत्र्यांनी निवडक आमदारांची घेतली बैठक 

पुढील वर्षी पंजाबमध्ये विधानसभेची निवडणूक होणार आहे. पण त्याआधीच काँग्रेसमधील अनेकांनी मुख्यमंत्र्यांच्या कारभारावर नाराजी व्यक्त केली होती. नवज्योतसिंग सिद्धू आणि मुख्यमंत्र्यांमध्ये सातत्याने जोरदार खडाजंगी होत होती. एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले जात असल्याने काँग्रेसमध्ये उघडपणे दोन गट पडल्याचे दिसत होते. सिद्धू यांची लोकप्रियता जास्त असल्याने पक्ष नेतृत्वालाही त्यांच्याकडे दुर्लक्ष करणे अवघड बनले होते. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख