बाळासाहेब ठाकरेंनी शहराचे नाव संभाजीनगर केलेलंच आहे; आता कुणाच्या परवानगीची गरज नाही..

शिवसेनेच्या मंत्र्यांकडून आपल्या अधिकृत लेटरहेडवरच आता संभाजीनगरचा अधिकृतपणे उल्लेख केला जात आहे.
बाळासाहेब ठाकरेंनी शहराचे नाव संभाजीनगर केलेलंच आहे; आता कुणाच्या परवानगीची गरज नाही..
Minister Subhash Desai news aurangabad

औरंगाबाद ः शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी या शहराचे नाव संभाजीनगर केलेलंच आहे, त्यामुळे आता नव्याने कुणाच्या परवानगीची गरज नाही. सरकारी पातळीवर, कागदोपत्री जे करायचे आहे, ते होतंच राहील. लोकांनी आता संभाजीनगर हे नाव वापरायला सुरूवात केली आहे, (Balasaheb Thackeray has named the city Sambhajinagar; Now no one's permission is required.) असे स्पष्ट करत उद्योग तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुभाष देसाई यांनी अधिकृत दौऱ्याच्या पत्रात संभाजीनगरचा उल्लेख करण्याचे समर्थन केले.

औरंगाबादचे संभाजीनगर असे नामांतर करण्याचा वाद गेल्या कित्येक वर्षापासून सुरू आहे. राज्यात महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर पुन्हा शहराचे नाव संभाजीनगर करण्याच्या प्रक्रियेला वेग आला. (Gardiuan Minister Subhash Desai) विभागीय आयुक्तांकडून या संदर्भातील प्रस्ताव गेल्यावर्षी मार्चमध्येच मागवण्यात आला होता. परंतु सत्तेतील काॅंग्रेस-राष्ट्रवादी या दोन पक्षाची नामांतरवर सहमती होत नाही, तोपर्यंत हा प्रस्ताव मंत्रीमंडळ बैठकीसमोर येणे शक्य नाही.

परंतु आगामी महापालिका निवडणुका पाहता शिवसनेला संभाजीनगरवर शिक्कामोर्तब करायचे आहे. सरकारी पातळीवर या नावाच उल्लेख करण्याचा प्रयत्न झाला, मात्र त्यावरून वादंग देखील निर्माण झाले होते. (Shivsena Aurangabad) परंतु शिवसेनेच्या मंत्र्यांकडून आपल्या अधिकृत लेटरहेडवरच आता संभाजीनगरचा अधिकृतपणे उल्लेख केला जात आहे. पालकमंत्री सुभाष देसाई यांनी आपल्या दौऱ्याच्या कार्यक्रम पत्रात शहराचा उल्लेख संभाजीनगर असा दहावेळा केला होता.

या संदर्भात आज पत्रकारांनी विचारले असता, सुभाष देसाई म्हणाले, औरंगाबादचे संभाजीनगर करणे हा आमच्या अस्मितेचा मुद्दा आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी या शहराचे नाव संभाजीगर केलेलेचं आहे, त्यामुळे आता नव्याने कुणाच्या परवानगीची गरज नाही.

शिवसेनेचे नेते आणि येथील जनता देखील संभाजीनगर असाच शहराचा उल्लेख करते. लोकांनी हे नाव स्वीकारले आहे. राहिला प्रश्न सरकार दरबारी हे नाव कागदोपत्री करण्याचा तर ते आम्ही करूच. पण लोकांनी संभाजीनगर म्हणायला सुरूवात करावी, असे आवाहन देखील देसाई यांनी केले.

Edited By : Jagdish Pansare

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in