गणराया कोरोना पाकिस्तानात जाऊ दे; नको जगातून नाहीसा कर..

शहरात चंद्रकांत खैरे आणि मी आहे तिथे अशांतता कशी असेल?
chandrakant khaire and imtiaz jalil news Aurangabad
chandrakant khaire and imtiaz jalil news Aurangabad

औरंगाबाद ः गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलिस आयुक्तांच्या उपस्थितीत झालेल्या शांतता समितीच्या बैठकीत आजी-माजी खासदारांमध्ये जुगलंबदी रंगली होती. ज्या शहरात चंद्रकांत खैरे आणि मी आहे, तिथे अशांतता असूच शकत नाही, असा दावा खासदार इम्तियाज जलील यांनी केला तेव्हा उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला. ( Corona go to Pakistan; Don't get lost in the world.) एकमेकांवर आरोप-प्रत्योराप करणारे हे दोन नेते जेव्हा शांततेची भाषा करत होते तेव्हा उपस्थितांमधील कुजूबूज बरंच काही सांगून जाणारी होती.

एवढ्यावर हे थांबले नाही तर मीच कसा चांगला हे सांगण्याची जणू स्पर्धाच या आजी-माजी खासदारांमध्ये लागल्याचे पहायला मिळाले. गणेशोत्सव शांततेत आणि सुरक्षितपणे साजरा व्हावा, (Shivsena Leader Chandrakant khaire) अशी इच्छी व्यक्त करतांनाच कोरोनाची तिसरी लाट येऊच नये, पण ती आलीच तर तिकडे पाकिस्तानात येऊ दे  असे साकडे शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी गणरायाला आपल्या भाषणातून घातले.

व्रकतुंड महाकाय अशा श्रीगणेशाला साकडे घालतांना आपण विचार देखील व्यापक ठेवला पाहिजे, असा टोला लगावत कोरोना केवळ भारतातूनच नाही तर संपुर्ण जगातून नाहीसा होऊ, दे अशी प्रार्थना इम्तियाज जलील यांनी गणरायाकडे केली. (Mp Imtiaz Jalil Auranagabad) इम्तियाज यांच्या भूमिकेचे उपस्थितांनी टाळ्या वाजवून स्वागत केले. एकंदरित शातंता समितीच्या बैठकीत देखील या दोन नेत्यांमध्ये तुतूमैमै दिसून आली.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गणेशोत्सव, नवरात्र, दिवाळी हे सण साधेपणाने साजरे करण्याचे आवाहन राज्य सरकारच्या वतीने करण्यात आले आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला असला तरी तिसऱ्या लाटेचा धोका अजूनही संभवतो आहे.

या पार्श्वभूमीवर बोलावलेल्या शांतता समितीच्या बैठकीत राजकीय भाषणबाजी चांगलीच गाजली. सात वर्षापासून मी वाट पाहतोय पण गणेशोत्सव जिल्हा समितीत माझे नाव घेतले जात नाही, फोटो छापला जात नाही याबद्दल खासदार इम्तियाज जलील यांनी नाराजी व्यक्त केली.

तर शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांचा मेरे बडे भाई असा उल्लेख करत चिमटाही काढला. ज्या शहरात चंद्रकांत खैरे आणि मी आहे तिथे अशांतता कशी असेल? असा सवाल करत त्यांनी सगळ्यांनाच बुचकाळ्यात टाकले.

या दोन नेत्यांची जुगलबंदी रंगणार हे स्पष्ट असतांनाच चंद्रकांत खैरे यांनी आपल्या भाषणाच्या शेवटी कोरोनाची तिसरी लाट येऊच नये, आलीच तर आपल्याकडे नको तिकडे पाकिस्तानात येऊ दे, असे साकडे गणरायला घातले.

हाच धागा पकडत इम्तियाज जलील यांनी आपल्या भाषणात खैरे यांची ही वृत्ती किती संकुचित आहे हे दाखवण्याचा प्रयत्न केला. वक्रतुंड महाकाय अशा श्रीगणेशाचा अर्थ समजावून सांगतानाच कोरोना केवळ भारतातूनच नाही तर संपुर्ण जगातून नाहीसा, करण्याची भूमिका मांडत गणरायाकडे प्रार्थना केली.

Edited By : Jagdish Pansare


 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com