खराब व्हेंटिलेटर बदलून घ्यावे, पण चुकीचे आरोप, राजकारण नको..

काही ठिकाणी उपलब्ध व्हेंटिलेटर पैकी काही पाच-सहा महिने पडून होते. त्यांचा वापर आणि योग्य ठिकाणी स्टोअर करून न ठेवल्यामुळे त्यात बिघाड झाला.
Bjp leader Devendra Fadanvis news  Aurangabad
Bjp leader Devendra Fadanvis news Aurangabad

औरंगाबाद ः पीएम केअरमधून पाठवण्यात आलेल्या व्हेंटिलेटरचा मुद्दा सध्या चांगलाच गाजतोय. मराठवाड्यासह राज्यभरातून हे व्हेंटिलेटर निकृष्ट दर्जाचे असल्याच्या तक्रारी लोकप्रतिनिधी व स्थानिक प्रशासनाकडून करण्यात आल्या. (Bad ventilators should be replaced, but false accusations, not politics, Said Devendra Fadanvis) यावर राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सर्वच व्हेंटिलेटर खराब किंवा नादुरूस्त आहेत, हा आरोप चुकीचा असल्याचे म्हटले आहे.

जी व्हेंटिलटर खराब आहेत ती बदलून घेतली पाहिजे, संबंधित कंपनीवर कारवाई देखील केली जावी, याबद्दल कुणाचेही दुमत असू शकत नाही. पण यावरून राजकारण आणि चुकीचे  आरोप करू नयेत, असे सांगत फडणवीस यांनी केंद्राने पाठवलेले व्हेंटिलेटर चांगलेच असल्याचा दावा केला.(Fadnavis claimed that the ventilator sent by the Center was good.) औरंगाबाद पुर्वचे भाजप आमदार अतुल सावे यांनी उभारलेल्या ५० बेडच्या आयसोलेशन सेंटरचे उद्घाटन फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले.

त्यानंतर प्रसार माध्यमांशी बोलतांना व्हेंटिलेटरचा मुद्दा समोर आला. एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांच्यासह राष्ट्रवादीचे आमदार सतीश चव्हाण व अन्य राजकीय पक्षांनी देखील घाटी रुग्णालयासह मराठवाड्यात पंतप्रधान सहायता निधीतून देण्यात आलेल्या व्हेंटिलेटर संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रारी केल्या होत्या. (Complaints were made to the District Collector regarding the ventilator provided from the Prime Minister's Assistance Fund.) यावरून राजकारण पेटलेले असतांना फडणवीस यांनी यावर आपली भूमिका स्पष्ट केली.

फडणवीस म्हणाले, व्हेंटिलेटरवरून टिका, आरोप करणे चुकीचे आहे. पीएम केअरमधून महाराष्ट्राला पाच हजार व्हेंटिलेटर पाठवण्यात आले होते. यातील ९० टक्के व्हेंटिलेटर हे सध्या विविध ठिकाणी वापरात आहेत. तर मराठवाडा व इतर काही भागात देखील ते व्यवस्थित सुरू आहेत. पण काही ठिकाणी उपलब्ध व्हेंटिलेटर पैकी काही पाच-सहा महिने पडून होते.(Some of the available ventilators were lying down for five-six months. They failed because they were not used and stored in the right place.) त्यांचा वापर आणि योग्य ठिकाणी स्टोअर करून न ठेवल्यामुळे त्यात बिघाड झाला.

या संदर्भात काही तक्रारी निश्चित आल्या आहेत. यात प्रामुख्याने ज्योती कंपनी तयार केलेल्या व्हेंटिलेटरचा समावेश आहे. त्यामुळे जे व्हेंटिलेटर नादुरुस्त आहेत, ते बदलून तर घेतलेच पाहिजे, शिवाय संबंधित कंपनीवर कारवाई देखील केली पाहिजे. (It is wrong to say that all the ventilators received from the PM Care Fund are bad)  पण काही तांत्रिक गोष्टींमुळे पीएम केअर फंडातू मिळालेले सगळेच व्हेंटिलेटर खराब आहेत, असा आरोप करणे चुकीचे असल्याचा पुनरुच्चार देखील फडणवीस यांनी केला.

Edited By : Jagdish Pansare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com