अजित पवारांचा वक्तशिरपणा प्रेरणा देणारा; गेवराई त्यांच्यामुळेच सुजलाम, सुफलाम.. - Ajit Pawar's punctuality inspiring; Gevrai Sujalam, Sufalam because of him jp75 | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

शरद पवार आज अमित शहांच्या भेटीला, शहांकडे सहकार खात्याचा कारभार आल्यानंतरची पहिलीच भेट

अजित पवारांचा वक्तशिरपणा प्रेरणा देणारा; गेवराई त्यांच्यामुळेच सुजलाम, सुफलाम..

दत्ता देशमुख
गुरुवार, 22 जुलै 2021

त्यांचा वक्तशिरपणा माझ्यासारख्या तरुण कार्यकर्त्यांना प्रेरणा देणारा आहे. त्यांचा कणखरपणा, विकासाची तळमळ, स्पष्टवक्तेपणा अनेकदा अनुभवला.
- विजयसिंह पंडित, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष बीड.

बीड : पवार व पंडित कुटूंबियांच नातं जसं राजकारणापलिकडचं आहे, तसचं पवारांच आणि गेवराई मतदार संघाच नातं देखील विकासाचं आहे. मतदार संघात सिंचन वाढून शेतकऱ्यांना सुजलाम सुफलाम करण्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा सिंहाचा वाटा असल्याची भावना जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विजयसिंह पंडित यांनी व्यक्त केली. (Ajit Pawar's punctuality inspiring; Gevrai Sujalam, Sufalam because of him.Said, Ex. Zp. president Vijaysinh Pandit,Beed) राज्याचे उपमुख्यमंत्री व वित्तमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसा निमित्त विजयसिंह पंडित यांनी त्यांच्या विषयीच्या भावना `सरकारनामा`,शी  बोलतांना व्यक्त केल्या.

पंडित म्हणाले, अजित पवारांचा वक्तशिरपणा माझ्यासारख्या कार्यकर्त्यांना प्रेरणा देणारा आहे. त्यांचा कणखरपणा, निर्णयक्षमता, विकासाची तळमळ आणि स्पष्टवक्तेपणा अलिकडे क्वचितच राजकारण्यांकडे दिसतो. (Ncp Leader, Deputy Minister Ajit Pawar, Mahrashtra) विकासाबाबत किती सकारात्मक असावं, शेतकऱ्यांच्या प्रश्नांबाबत किती कळवळा असावा आणि विकासाच्या बाबतीत पक्षीय विनिवेष नसावा याच उदाहरण म्हणजे अजित पवार आहेत.

याचे एक उदाहरण म्हणून विजयसिंह पंडित सांगातात, राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस तथा माजी आमदार अमरसिंह पंडित भाजपात होते. मतदार संघातून सिंदफणा व गोदावरी नद्या वाहतात. परंतु, त्याचा पुर्वी सिंचनासाठी फायदा नव्हता. पावसाळ्यात पाणी यायचे आणि वाहून जायचे. सिंदफना नदीकाठच्या गाव शिवारांत दहा - दहा परस काळी माती. अगदी सोनं पेरलं तर सोनं उगवेल अशी. पण, सिंचनाची सुविधा नव्हती.

अमरसिंह पंडित यांनी सिंदफना नदीवर सिरसमार्गला बॅरेज उभारणीचा प्रस्ताव तयार करुन अजित पवारांकडे नेला. त्यांना बॅरेजची गरज व होणारा फायदा लक्षात येताच कुठलाही विलंब न लावता त्याला मंजूरी दिली. आता हा भाग संत्री उत्पादक हब म्हणून पुढे येत आहे. मतदार संघात गोदावरी नदीवर उभारलेले बॅरेजेस व त्याच्यामुळे वाढलेले सिंचन आणि परिणामी शेतकऱ्यांना आलेला उर्जीत काळ ही केवळ अजित पवारांची देण असल्याचा आवर्जुन उल्लेख पंडित यांनी केला.

कधी रिकाम्या हाताने परत आलो नाही..

मुळात पवार व पंडित कुटूंब राजकारणात कायम एकत्र. जेष्ठ नेते शरद पवार यांनी राष्ट्रवादीची स्थापना केल्यानंतर जिल्ह्यात त्यांची साथ प्रथम जेष्ठ नेते शिवाजीराव पंडित यांनी दिली. राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम केले. काही बाबींमुळे आम्हाला काही काळ वेगळा विचार करावा लागला. शिवाजीराव दादा कायम पवारांसोबतच होते. दुसरा एक मुद्दा विजयसिंह पंडित यांनी सांगीतला.

अजित पवार म्हणजे नैतिक राजकीय मुल्य जपणारे नेते आहेत. आम्ही २०१२ जिल्हा परिषद निवडणुकीत विनाअट राष्ट्रवादीला मदत केली. नंतर प्रवेशातही कुठली अट घातली नाही. पण, राजकीय मुल्य काय असते आणि राजकारणात कधी, केव्हा व कुठे कोणाला संधी द्यायची याची जाण त्यांना आहे. अमरसिंह पंडित यांना विधान परिषद आणि मला जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाची संधी दिली.

आता जिल्हा परिषदेची उभारलेली इमारत माझ्याच अध्यक्षपदाच्या काळात मंजूर झाल्याचे त्यांनी सांगितले. आता महाविकास आघाडी सरकारमध्ये उपमुख्यमंत्री आणि वित्तमंत्री असलेल्या अजित पवार यांनी गेवराई विधानसभा मतदार संघाच्या विकासाठी कायम सढळ मदत केली. या भागातील रस्ते, सभागृह अशा कोट्यावधींच्या निधीला त्यांनी मंजूरी दिली आहे. त्यांच्याकडे विकासाचा प्रस्ताव घेऊन गेल्यानंतर मी किंवा अमरसिंह पंडित कधीही रिकाम्या हाताने परत आलो नाहीत, असेही विजयसिंह पंडित म्हणाले.

हे ही वाचा ः बोले तैसा चाले, असे नेते अजित पवार, माझ्या जडणघडणीत त्यांचे योगदान..

Edited By : Jagdish Pansare
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख