बोले तैसा चाले, असे नेते अजित पवार; माझ्या जडणघडणीत त्यांचे योगदान..  - Great Leader Ajit Pawar, Their contribution to my life jp75 .. | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सांगलीकडे रवाना, पूरग्रस्त भागाची पाहणी करणार

बोले तैसा चाले, असे नेते अजित पवार; माझ्या जडणघडणीत त्यांचे योगदान.. 

दत्ता देशमुख
गुरुवार, 22 जुलै 2021

बोले तैसा चाले... ही म्हण लिहिणाऱ्याने त्या काळात अजित पवारांसाख्या कुणालातरी डोळ्यासमोर ठेवून लिहिलेली असावी. याची प्रचिती मला कित्येक अनुभवातून आली आहे. माझ्या राजकीय जडणघडणीत, आज मी आहे त्या पदासहित आजवर जी कामे करू शकलो त्या सर्वांमध्ये त्यांचे योगदान आहे. त्याची प्रचिती व अनुभूती आजवर घेत आलो आहे.
- धनंजय मुंडे, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री महाराष्ट्र राज्य.

बीड ः राजकारणात दिलेला शब्द पूर्ण करण्यासाठी प्रसंगी नुकसान, टीका आणि टोकाचा विरोध सहन करतील पण दिलेला शब्द पाळणारच, असे अलिकडच्या काळात बोटावर मोजण्याइतकेच नेते आहेत. (Great Leader Ajit Pawar,  Their contribution to my life, Said, Dhnanjay Munde) त्यापैकीच अजित पवार यांच नाव आवर्जुन घ्यावं लागेल. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, राज्याचे उपमुख्यमंत्री आणि वित्तमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसा निमित्त त्यांच्याविषयी राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री आणि बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धंनजय मुंडे यांनी आपल्या भावना `सरकारनामा`,शी बोलतांना व्यक्त केल्या.

बोले तैसा चाले... ही म्हण लिहिणाऱ्याने त्या काळात अजित पवारांसारख्याच कुणालातरी डोळ्यासमोर ठेवून लिहिलेली असावी, याची प्रचिती मला कित्येक अनुभवातून आली आहे.  माझ्या राजकीय जडणघडणीत, आज मी आहे त्या पदासहित आजवर मी जी कामे करू शकलो त्या सर्वांमध्ये त्यांचे योगदान आहे. ( Deputey Minister Ajit Pawar Maharashtra) मला याची प्रचिती व अनुभूती आजवर कायम आली आहे.

अजित पवारांच्या कामाविषयी बोलताना मुंडे म्हणाले,  लॉकडाऊन काळात सगळं बंद असताना सकाळी सात वाजल्यापासून रात्री उशिरापर्यंत त्यांचे मंत्रालयातील कार्यालय सुरू असायचे.  स्वतः अजित पवार बसून असायचे, महाराष्ट्राचे अर्थचक्र चालावे म्हणून कोणी असो नसो, त्यांचे कार्य अविरत सुरू असायचे. त्यांची केबिन सकाळपासून अगदी मध्यरात्रीपर्यंत सुरू असते.  त्यांच्या अविरत कार्यशैलीची हीच ती प्रेरणा आहे, जी माझ्यासारखे असंख्य तरुण राजकारणात नव्याने काम सुरू करताना शिकायचा प्रयत्न करतात.

आम्ही मुंडे कोणत्याही कार्यक्रमाला कधी वेळेवर जात नाहीत अशी चर्चा असते. त्यांच्या बाबतीत हे उलट आहे, कोणी नाही आलं तरी चालेल पण अजित पवार कार्यक्रम, बैठक किंवा अगदी प्रचारसभा का असेना दिलेल्या वेळीच हजर. अनेकदा ते लवकर येण्याने आमची तारांबळ सुद्धा होते.

परळीला पाणी देणारे भगीरथ..

पवार पहिल्यांदा आमच्या परळीला आले, तेव्हा दिलेला शब्द त्यांनी एक क्षणात पूर्ण केला. कोट्यावधी रुपयांचा विकासनिधी परळीसाठी दिला. पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी मिटवला. परळीला पाणी देणारे ते भगीरथ ठरले. दिलेल्या शब्दावर किती ठाम असतात याची प्रचिती त्याच दिवशी मला प्रथम आली. आजही आमच्या परळीतील नगरोत्थान योजनेसाठी वाढीव निधी मागताच दादांनी नवीन प्रशासकीय मान्यता देण्याचे अधिकाऱ्यांना निर्देश दिले.

त्यांच्या अंगी असलेल्या स्पष्ट व सडेतोड वाणीमुळे आणि आजकाल सोशल मीडियाच्या वाढलेल्या अति वापरामुळे त्यांच्या अंगी असलेल्या सकारात्मक सद्गुणांना बाजूला ठेऊन त्यांच्यावरील क्रीटीसीजमचा अधिक उदो उदो केला जातो. याचे वाईट वाटत असले तरी कोणत्याही टीकेमुळे खचतील ते पवार कसले? असेही धनंजय मुंडेनी  आवर्जुन सांगितले.

माझ्यासारख्या राजकारणात व समाजकारणात काम करणाऱ्या तरुण कार्यकर्त्याला अजित पवारांसारखा पाठराखा मिळणे मोठी गोष्ट आहे. कारण 'अनंत टीकेचे धनी' अशीच आमच्या दोघांची ओळख अनेकवेळा माध्यमांसमोर मांडली जाते. त्यांच्या वक्तीशीरपणाचे उदाहरण सांगताना मुंडे म्हणतात, मागील आघाडी सरकारच्या काळात पुणे जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळेच्या इमारत व आधुनीकीकरण कार्यक्रमास पालकमंत्री व उपमुख्यमंत्री म्हणून ते येणार होते. जिल्हा परिषद अध्यक्ष, शिक्षण समिती, पदाधिकारी-अधिकाऱ्यांनी तसेच संबंधित शाळेने कार्यक्रमाची जय्यत तयारी केली. त्यांनी सकाळी साडेआठची वेळ दिली.

वेळेचे काटेकोरपणे पालन, अन् फजिती..

उपमुख्यमंत्री आहेत, वेळेवर येतात असा निरोप होता, पण अधिकारी, पदाधिकारी सव्वा नऊला येण्यास सुरुवात झाली. जेव्हा सगळे शाळेत पोचले तेव्हा दादा ठीक ८.२० वाजता शाळेत आले. शाळकरी मुले व शिक्षकांसोबत कार्यक्रम उरकला व पुढील कार्यक्रमास निघून गेले. वक्तशीरपणा त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा एक अजोड भाग आहे, आम्ही त्याकडे आदर्श म्हणून पाहतो. जेष्ठ नेते व राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवारांच्या किमयेने राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आले. सामाजिक न्याय मंत्री म्हणून मी आणि अर्थमंत्री म्हणून अजित पवारांनी जबाबदारी स्वीकारल्यानंतर पहिल्याच अर्थसंकल्पात दादांनी सामाजिक न्याय खात्याला भरभरून निधीची तरतूद केली.

कोरोनाच्या काळात राज्याची आर्थिक परिस्थिती बिकट असतानाही संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ आणि अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीचा विषय मी त्यांच्याकडे घेऊन गेलो. तेव्हा एका तासात तो सोडवून तातडीने कोट्यावधी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला, अशी अनेक उदाहरणं देत मुंडे यांनी अजित पवारांचे व्यक्तीत्वाचे पैलु उलगडले.

हे ही वाचा ः देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार दोघेही कर्तृत्ववान, परखड नेते- चंद्रकांत पाटील..

Edited By : Jagdish Pansare
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख