काॅंग्रेस-शिवसेना नेत्यांच्या दौऱ्यानंतर आता अजित पवार उद्या बीडमध्ये.. - After the visit of Congress-Shiv Sena leaders, now Ajit Pawar is in Beed tomorrow. | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी सकाळी ८.३० वाजता आषाढी पौर्णिमा- धम्म चक्र दिवशी देशवासियांशी संबोधित करतील . मोदी यांनी ट्विटद्वारे याबाबत माहिती दिली आहे.
चिपळूणमध्ये : पुराचे पाणी अपरांत हाँस्पिटलमध्ये शिरले त्यामुळे वीज पुरवठा बंद झाल्यामुळे व्हेंटिलेटरवरील ८ रुग्ण दगावले.

काॅंग्रेस-शिवसेना नेत्यांच्या दौऱ्यानंतर आता अजित पवार उद्या बीडमध्ये..

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 17 जून 2021

ऊर्जामंत्री नितीन राऊत व शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांचे दौरे ताजे असताना अजित पवार देखील येत आहेत. 

बीड : राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांचा जिल्हा दौरा निश्चित झाल्याची खात्रीशीर माहिती आहे. (After the visit of Congress-Shiv Sena leaders, now Ajit Pawar is in Beed tomorrow.) शुक्रवारी (ता. 18) होणाऱ्या दौऱ्याच्या अनुषंगाने प्रशासकीय पातळीवर तयारी सुरू आहे.  खरीप हंगाम आढावा आणि कोव्हीड उपाय योजनांचा पवार आढावा घेणार आहेत.

प्रशासकीय निमित्त असले तरी दौऱ्याला राजकीय महत्व अधिक आहे. (Deputy Chief Minister Ajit Pawar) कारण नुकताच काँग्रेसचे मंत्री नितीन राऊत आणि शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे यांचे दौरे आटोपताच अजित पवार दौऱ्यावर येत असल्याने याला राजकीय झालर दिसत आहे. 

राष्ट्रवादी काँग्रेस स्थापनेपासून जिल्ह्याने पक्षाच्या मागे कायम ताकद उभी केलेली आहे. आताही  चार आमदार, जिल्हा परिषदेसह इतर महत्वाच्या संस्था पक्षाच्या ताब्यात आहेत. (Congress Energy Minister Nitin Raut) राष्ट्रवादीचे सर्व्हेसर्वा शरद पवारांना मानणाऱ्या जिल्ह्यात अजित पवार यांना मानणारे नेतेही आहेत.

दरम्यान, राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यापासून पवार यांचा जिल्हा दौरा झाला नव्हता. (Shivsena Leader Chandrakant Khaire) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची स्वतंत्र घेतलेली भेट आणि त्यानंतर राष्ट्रवादीच्या वर्धापन दिन कार्यक्रमात शरद पवार आणि आगामी निवडणुकांतील आघाडीबाबत केलेले वक्तव्य आणि लगेच काँग्रेस मंत्री व नेत्यांनी राज्यभर सुरू केलेले दौरे या पार्श्वभूमीवर आता अजित पवार यांच्या दौऱ्याला महत्व आले आहे.

काँग्रेस नेते व ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी नुकताच ऑक्सिजन प्लँट पाहणी आणि वीज उपकेंद्र उदघाटनाच्या निमित्ताने जिल्ह्याचा दौरा केला तर नगरपंचायत निवडणुकांच्या निमित्ताने शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांचा दौरा सुरू आहे.

त्यातच अजित पवार खरीप हंगाम आढावा आणि कोव्हीड आढावा घेण्याच्या कारणाने येत असले तरी त्यांच्या दौऱ्याला राजकीय झालर निश्चित आहे. दरम्यान, दौऱ्याचा शासकीय कार्यक्रम अद्याप आला नसला तरी शुक्रवारच्या दौऱ्याच्या तयारीची लगबग सुरू आहे.

हे ही वाचा ः मुख्यमंंत्र्यांकडून राज्यपालांना वाढदिवसाच्या शुभेच्छा. रिटर्न गिफ्ट मिळणार का?..

Edited By : Jagdish Pansare
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख