मुख्यमंत्र्यांकडून राज्यपालांना वाढदिवसाच्या शुभेच्छा; रिटर्न गिफ्ट मिळणार का? 

त्यातच विधानपरिषदेवर राज्यपाल वियुक्त १२ आमदारांची नावे मंजूर होत नसल्याने महाविकास आघाडी सरकारकडून राज्यपालांना लक्ष्य केले जात आहे.
  Chief Minister Uddhav Thackeray,  Bhagat Singh Koshyari .jpg
Chief Minister Uddhav Thackeray, Bhagat Singh Koshyari .jpg

मुंबई : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी मसुरीला आयएएस अकादमीत शासकीय कार्यक्रमासाठी निघालेले असताना विमानातून उतरवले गेल्याने महाविकास आघाडी सरकारशी त्यांचे संबंध चांगलेच ताणले गेले होते. त्यातच विधानपरिषदेवर राज्यपाल वियुक्त १२ आमदारांची नावे मंजूर होत नसल्याने महाविकास आघाडी सरकारकडून राज्यपालांना लक्ष्य केले जात आहे. मात्र, त्यातच गुरुवारी सकाळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी राज्यपालांची भेट घेतली आहे. (Chief Minister Uddhav Thackeray meet on the Governor)

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा आज ८० वा वाढदिवस आहे. त्यामुळे शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर यांनी कोश्यारी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. मात्र, त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्वतः राजभवन येथे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची वाढदिवसानिमित्त सदिच्छा भेट घेतली आणि त्यांचे अभिष्टचिंतन केले. यावेळी त्यांच्यासमवेत राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे, मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव आशिष कुमार सिंह, शिवसेना पक्ष सचिव मिलिंद नार्वेकर उपस्थित होते. राज्यपालांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी मुख्यमंत्री स्वतः पोहोचले त्यामुळे त्यांना आता रिटर्न गिफ्ट काय मिळणार याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. 

दरम्यान, राज्य मंत्रीमंडळाने निर्णय घेऊन, राज्यपालांकडे १२ विधानपरिषदेवर राज्यपाल नियुक्त सदस्यांच्या नावाची यादी दिली आहे. मात्र, आठ महिने उलटूनही राज्यपालांनी कोणताही निर्णय घेतलेला नाही. हे प्रकरण आता उच्च न्यायालयात गेले आहे. दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार व राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी दिल्लीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मराठा आरक्षणासंदर्भात भेट घेतली होती. त्या भेटीत सुद्धा पंतप्रधान मोदींकडे ठाकरे यांनी १२ आमदारांच्या नियुक्तीचा विषय काढला होता. 

त्यामुळे राज्यपाल आणि महाविकास आघाडीमध्ये तणाव निर्माण झाला होता. या सगळ्या विषयांच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी वाढदिवसानिमित्त राज्यपालांची भेट घेतली आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात राज्यपाल व महाविकास आघाडीतील संबंध सुधारणार का, असे बोलले जात आहे.   

Edited By - Amol Jaybhaye  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com