जालना जिल्ह्यासाठी २६ नवीन रुग्णवाहिका,जनांवरांसाठी दोन फिरते रुग्णालये..

नवीन २६ नवीन रुग्णवाहिका देण्यात आल्याने ग्रामीण रुग्णालयात आता रुग्ण वाहिकांची अडचण येणार नाही.
Health Minister Rajesh Tope News jalna
Health Minister Rajesh Tope News jalna

जालना ः जालना जिल्ह्यासाठी २६ नवीन रुग्णवाहिका देण्यात आल्या असून जनावरांसाठी दोन फिरते रुग्णालये सुरु करण्यासाठी २ वाहनं देण्यात आल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.

गेल्या १० वर्षांपूर्वी जिल्ह्यासाठी अँबुलन्स देण्यात आल्या होत्या. मात्र आता ही वाहनं जुनी झाली असून नवीन २६ नवीन रुग्णवाहिका देण्यात आल्याने ग्रामीण रुग्णालयात आता रुग्ण वाहिकांची अडचण येणार नाही,असेही टोपे यांनी स्पष्ट केले. (26 new ambulances for Jalna district, two mobile hospitals for animals, said health minister rajesh tope) दोन फिरत्या दवाखान्यासाठी व्हॅन मिळाल्याने शेतकऱ्यांच्या शेतावर जाऊन जनावरांवर उपचार करता येणं शक्य होणार असल्याचे टोपे म्हणाले, 

सतरा लाख परत करणार- जिल्हाधिकारी

जालना शहरातील १२ रुग्णालयांनी कोरोनाच्या उपचारासाठी २९१ रुग्णांकडून शासकीय दरापेक्षा १७ लाख रुपये जास्त आकारल्याच समोर आले होते. (It was found that 291 patients were charged Rs 17 lakh more than the government rate for the treatment of corona.) या प्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांनी या रुग्णालयांना कारणे दाखवा नोटीस बजावल्या होत्या.

जिल्हाधिकाऱ्यांनी नोटिसा बजावल्यानंतर अखेर आज या रुग्णालयांचे प्रमुख आणि जिल्हाधिकारी यांच्यात झालेल्या बैठकीत रुग्णांकडून शासकीय दरापेक्षा जास्तीचे आकारलेले  १७ लाख रुपये रुग्णांना परत करण्याचा निर्णय घेण्यात आला. (The District Collector has informed that this amount will be returned in the next 7 days.) येत्या ७ दिवसांत ही रक्कम परत करणार असल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे.

Edited By : Jagdish Pansare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com