अर्धांग वायूच्या सौम्य झटक्यातून आमदार अमोल मिटकरी बचावले... - mla amol mitkari escapes from mild paralysis attack | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

मंत्रिमंडळाची बैठक सुरु असताना जयंत पाटलांची प्रकृती बिघडली...ब्रीच कॅण्डी रुग्णालयात दाखल

अर्धांग वायूच्या सौम्य झटक्यातून आमदार अमोल मिटकरी बचावले...

सरकारनामा ब्यूरो
सोमवार, 12 जुलै 2021

दरम्यान अमोल मिटकरी यांच्या प्रकृतीत सुधारणा असून चिंता करण्यासारखे काही नसल्याचे त्यांच्या निकटवर्तीयांकडून सांगण्यात आले आहे आणि आमदार मिटकरींनी स्वतः आपल्या प्रकृतीची माहिती दिली आहे.

अकोला : राष्ट्रवादी काँग्रेसचे विधानपरिषद सदस्य अमोल मिटकरी Amol Mitkar यांना आज दुपारी १२ वाजताच्या सुमारास हिंगणा येथील पक्षाच्या कार्यक्रमात बोलत असताना अचानक अर्धांग वायूचा सौम्य झटका आल्याने एकच गोंधळ उडाला. त्यांना तात्काळ आयकॉन हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असून प्रकृतीत सुधारणा असल्याची माहिती त्यांच्या निकटवर्तीयांनी दिली. His relatives informed that there is an improvement in his condition. 

राष्ट्रवादी सांस्कृतिक आणि चित्रपट आघाडीच्या विदर्भ संयोजक गायिका वैशाली माडे यांचा आज अकोला दौरा होता. जिल्हाध्यक्ष संग्राम गावंडे यांच्या बिफॉर्म कॉलेजमध्ये हा कार्यक्रम सुरू होता. अमोल मिटकरी यांनी मार्गदर्शन केल्यावर शेवटी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची ‘माझी मैना गावाकडे राहिली, माझ्या मनाची होतीया काहिली, ही छक्कड खड्या आवाजात गायला सुरुवात केल्यावर काही क्षणांत त्यांचा आवाज चिरका व्हायला लागला, तोंड किंचित वाकडे होत असल्याची जाणीव उपस्थित काहींना होताच तात्काळ त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले.

दरम्यान अमोल मिटकरी यांच्या प्रकृतीत सुधारणा असून चिंता करण्यासारखे काही नसल्याचे त्यांच्या निकटवर्तीयांकडून सांगण्यात आले आहे आणि आमदार मिटकरींनी स्वतः आपल्या प्रकृतीची माहिती दिली आहे. ‘माझी प्रकृती आता सुधारत आहे. चिंता करण्यासारखे काही कारण नाही. कोविडचा काळ असल्यामुळे आपला जीव धोक्यात घालून कुणीही मला भेटायला येऊ नये’, अशी विनंती मिटकरींनी कार्यकर्ते, मित्रपरिवारातील सदस्य आणि हितचिंतकांना केली आहे. 

हेही वाचा : सरकार टिकेल, पुन्हाही आघाडी शक्य ! बाळासाहेेब थोरातांचा फडणवीसांवर निशाना

आमदार मिटकरी हे राष्ट्रवादी कॉंग्रेसची मुलुखमैदानी तोफ आहेत. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीमध्ये डॉ. अमोल कोल्हे आणि अमोल मिटकरी यांनी पायाला चक्री लावून राज्यभर दौरे केले होते आणि राष्ट्रवादी कॉंग्रेससाठी वातावरण निर्मिती केली होती. त्याचे फळ म्हणून पक्षश्रेष्ठींनी डॉ. कोल्हे यांना खासदार तर मिटकरी यांना विधानपरिषद सदस्य बनवले. आमदार झाल्यानंतरही आमदार मिटकरींनी आपल्या नेतृत्वाची चुणूक दाखवत मतदार संघात उत्कृष्ट कामगिरी केली आहे. खासगी इस्पितळात सध्या ते भरती आहे. कोरोनाच्या काळात कुणीही भेटायला येऊ नये, असे आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना आणि हितचिंतकांना केले आहे. त्यामुळे सोशल मिडियावरून त्यांच्या हितचिंतकांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. 
 Edited By : Atul Mehere
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख