सरकार टिकेल, पुन्हाही आघाडी शक्य ! बाळासाहेेब थोरातांचा फडणवीसांवर निशाना

मध्यवर्ती निवडणूका होणार नाहीत, आमचे सरकार तीन वर्षे चालेल. एवढेच नाही तर राज्यात पुन्हा आघाडी सरकार सत्तेवर आले तर आश्चर्य मानू नये.
balasaheb thorat 1.jpg
balasaheb thorat 1.jpg

संगमनेर : मध्यवर्ती निवडणूका झाल्या तर आघाडी सरकार धाराशयी होईल, असे वक्तव्य विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnvis) यांनी केले. यावर निशाना साधताना फडणवीसांच्या अनेक घोषणा हवेतच विरल्या आहेत. त्या प्रत्यक्षात खऱ्या होत नाहीत, त्यामुळे त्यांनी केलेल्या मध्यवर्ती निवडणूकीच्या घोषणेलाही काही अर्थ नाही. मध्यवर्ती निवडणूका होणार नाहीत, आमचे सरकार तीन वर्षे चालेल. एवढेच नाही तर राज्यात पुन्हा आघाडी सरकार सत्तेवर आले तर आश्चर्य मानू नये, असे प्रतिपादन महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले. (Government will last, lead is possible again! Balasaheb Thorat's target on Fadnavis)

तालुक्यातील वडगावपान येथे दंडकारण्य अभियानानिमित्त आले असताना ते पत्रकारांशी बोलत होते. विधानसभा अध्यक्ष निवडीबद्दल बोलताना ते म्हणाले, की शिवसेनेने अद्यापही कोणताच दावा केलेला नाही. आम्ही तीन्ही पक्षाचे प्रमुख एकत्र बसून निर्णय करतो. मात्र, अध्यक्ष काँग्रेसचाच राहील. महाराष्ट्र व गुजरातमध्ये पाण्यावरून संघर्षाचे काही कारण नाही. पश्चिमेकडे खुप मोठ्या प्रमाणात पाणी वाहून जाते तर सह्याद्रीच्या पुर्वेकडील आपला भाग तुटीचे खोरे बनले आहे. धरणे भरत नाहीत, कायम पाण्याचा तुटवडा येतो. ही टंचाई दूर करायची असेल तर पश्चिमेकडील समुद्रात जाणारे पाणी पुर्वेला घेणे ही काळाची गरज आहे. भाई जगतापांच्या व काँग्रसेच्या आंदोलनावर टिका करण्यापेक्षा फडणवीसांनी केंद्र सरकारने पेट्रोल, डिझेल आणि गॅसची दरवाढ करून सर्वसामान्य माणसांना महागाईचे जे चटके दिलेत त्या संदर्भात त्यांनी लक्ष द्यावे. त्यांचे केंद्रात चांगले वजन आहे, असा टोला लगावला.

शेतकऱ्यांसाठी चांगल्या सुचना येतील त्यानुसार अंतिम निर्णय घेण्यात येईल.
आघाडीतील तिघांनाही पक्ष वाढवण्याची गरज आहे. तो प्रत्येकाला अधिकार आहे. त्यादृष्टीने आम्ही काम करत असतो. त्यात चुकीचे काही नाही, स्वबळाचा नारा शिवसेनेने दिला असे कुठही मला दिसत नाही. शक्य होईल तितक्या निवडणूका आम्ही एकत्रित लढवणार आहोत. वनमंत्रीपद रिक्त नाही त्याचा कारभार मुख्यमंत्र्यांकडे आहे, त्यामुळे कामास चांगली गती येईल. १०२ वी घटना दुरूस्ती काय आहे ? राज्य सरकारकडे ते अधिकारच नसल्याचे सिध्द झाल्याने ती जबाबदारी केंद्राची आहे असे ते म्हणाले.

हेही वाचा..

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com