आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणी शिवसेनेच्या उपशहरप्रमुखासह तिघांविरोधात गुन्हा दाखल..

हे तिघे अल्पेश यास त्रास देत होते. त्यामुळे त्याने आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली.
Shivsena Akola News
Shivsena Akola News

अकोला : शहरातील एका युवकाने घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. या प्रकरणात शिवसेनेचे  उपशहरप्रमुख यांच्यासह तिघांवर जुने शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (A case has been registered against three persons including Shiv Sena's deputy city chief for inciting suicide.) उपशहरप्रमुख योगेश अग्रवाल आणि सुशील दांदळे यांना अटक करण्यात आली आहे. तर विशाल पुरोहित हा फरार झाला आहे. 

जुने शहरातील जयहिंद चौक परिसरात अल्पेश अरविंद उपाध्याय हा राहतो. अल्पेश हा योगेश अग्रवाल, सुशील दांदळे आणि विशाल पुरोहित यांच्या संपर्कामध्ये नेहमीच होता. (Akola Police Filed Fir Against Shivsena Activites) त्यांच्यामध्ये पैशांचा व्यवहार असल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. त्यामुळे त्यांच्यात या कारणावरून वाद ही झाले होते.

हे तिघे अल्पेश यास त्रास देत होते. त्यामुळे त्याने आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. त्याने आत्महत्येपूर्वी एक चिठ्ठी लिहून ठेवली असून यात त्याने 'योगेश अग्रवाल, सुशील दांदळे आणि विशाल पुरोहित यांनी मानसिक त्रास दिल्याचे म्हटले आहे.

`कोरोना के कारण उपरवालोके प्रेशर के कारण मै ये गलत काम कर रहा हु, जय गजानन. मैने सबकी हेल्प की, पर मेरे बुरे समय मे कोई साथ नही आया' असेही त्याने नमूद केले आहे.

 याप्रकरणी सोमवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल झाला. यामध्ये पोलिसांनी योगेश आणि विशाल या दोघांना अटक केली आहे. यातील तिसरा आरोपी अद्यापही फरार आहे. पुढील तपास जूने शहर पोलिस निरीक्षक श्रीरंग सणस यांनी केले आहे.

Edited By : Jagdish Pansare
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com