राहाता नगराध्यक्ष ममता पिपाडांवर आंदोलनाची वेळ

नोव्हेंबर-2019 पासून सफाई ठेकेदाराला पेमेंट दिलेले नाही. त्यामुळे ठेकेदाराकडील कर्मचारी वारंवार पालिकेला आंदोलनाचा इशारा देत पत्रव्यवहार करीत आहेत. त्यातून शहरस्वच्छतेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. मुख्याधिकारी सरोदे यांनी गांभीर्याने विचार करून नियमानुसार ठेकेदाराला पेमेंट अदा करावे.- ममता पिपाडा, नगराध्यक्ष, राहाता
राहाता नगराध्यक्ष ममता पिपाडा आंदोलनाची वेळ
राहाता नगराध्यक्ष ममता पिपाडा आंदोलनाची वेळ

कोपरगाव : राहाता पालिकेतील सफाई कर्मचाऱ्यांचे पगार चार महिन्यांपासून रखडले असून, त्यामुळे शहरस्वच्छतेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. ठेकेदाराचे थकीत पेमेंट अदा करण्याच्या मागणीसाठी नगराध्यक्ष ममता पिपाडा यांनी आज पालिकेसमोर ठिय्या आंदोलन करीत लक्ष वेधले.
 
दरम्यान, याबाबत अतिरिक्त कार्यभार असलेले मुख्याधिकारी प्रशांत सरोदे यांनी शासनाच्या नियमानुसार व जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार काम सुरू असल्याचे पत्रकारांशी बोलताना सांगितले. 

शहर स्वच्छतेचा प्रश्न ऐरणीवर
नगराध्यक्ष पिपाडा म्हणाल्या, ""नोव्हेंबर-2019पासून सफाई ठेकेदाराला पेमेंट दिलेले नाही. त्यामुळे ठेकेदाराकडील कर्मचारी वारंवार पालिकेला आंदोलनाचा इशारा देत पत्रव्यवहार करीत आहेत. त्यातून शहरस्वच्छतेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. नागरिकांच्या रोषाला आम्हाला सामोरे जावे लागते. मुख्याधिकारी सरोदे यांनी गांभीर्याने विचार करून नियमानुसार ठेकेदाराला पेमेंट अदा करावे, असे सुचवले होते. मात्र, अजूनही पेमेंट न काढल्याने सफाई कर्मचाऱ्यांनी पालिकेसमोर ठिय्या आंदोलन सुरू केले आहे.''

आंदोलनात नगराध्यक्ष पिपाडा, गटनेते विजय सदाफळ, आरोग्य विभागाचे सभापती सलीम शहा, सचिन मेहेत्रे यांनी भाग घेतला.

ठेकेदाराकडेच वसुली निघेल : सरोदे
मुख्याधिकारी सरोदे म्हणाले, ""ठेकेदार भाग्यश्री कंपनीच्या नोव्हेंबर व डिसेंबरच्या धनादेशांवर दोन दिवसांपूर्वी सह्या केल्या आहेत. जिल्हाधिकाऱ्यांनी कामाचा ठेका पुनर्गठित केला असून, ठेकेदाराकडेच शासनाची वसुली निघणार आहे. शासनाच्या चौकटीत बसेल तेच काम करीन. चुकीच्या कामावर सही करणार नाही.' 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com