Nana Patole : प्रदेशाध्यक्षपद जाणार की राहणार? काँग्रेसच्या नाना पटोलेंनी स्पष्टच सांगितलं

Congress News : पक्षाचं शंभर टक्के काम करणारा कार्यकर्ता...
Nana Patole
Nana PatoleSarkarnama

प्राची कुलकर्णी -

Nana Patole News : माजी मंत्री व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात आणि प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यातील वादाची दखल घेत कॉंग्रेस पक्षश्रेष्ठींनी रमेश चेन्निथला यांची याप्रकरणाच्या चौकशीसाठी नियुक्ती केली होती. तसेच त्याचा अहवाल तयार करण्याचे निर्देशही दिले होते. आता या नाराजी नाट्याचा अहवाल तयार कऱण्यात आला असून कॉंग्रेस नेते रमेश चेन्निथला यांनी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या अनेक पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून हा अहवाल अंतिम केला आहे.

रायपूर येथे होणाऱ्या २६ फेब्रुवारीला काँग्रेसच्या राष्ट्रीय अधिवेशनात हा अहवाल राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांना सादर केला जाणार असल्याची माहिती आहे. यानंतर पटोलेंच्या प्रदेशाध्यक्षपदाबाबत अंतिम निर्णय घेतला जाणार आहे. मात्र,याचदरम्यान नाना पटोलेंनी मोठं विधान केलं आहे.

नाना पटोले यांनी 'साम' वृत्तवाहिनीला विशेष मुलाखत दिली. यावेळी त्यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केलं. यात प्रदेशाध्यक्षपदाबाबतच्या चर्चांवर बोलताना पटोले यांनी पक्ष जो काही निर्णय देईल तो मान्य असेल.तसेच हायकमांडचा आदेश मानणारा आहे.तसेच काँग्रेसच्या बूथचं अध्यक्ष केलं तरी त्यासाठी पक्षाचं शंभर टक्के काम करणारा कार्यकर्ता आहे असंही नाना पटोले(Nana Patole) यावेळी म्हणाले.

पटोले म्हणाले, थोरात आणि मी एकत्र आहोत. हे दाखवायला मला बजरंगबलीसारखं छाती फाडता येणार नाही असं म्हणतानाच सत्यजित तांबे यांचं थेट नाव न घेता ज्यांना जायचं होत ते गेले. ते गेले म्हणून काँग्रेस संपणार नाही. उलट नाशिकमध्ये एक गेला तर ५० आमदार काँग्रेसचे निवडून आणणार असं वक्तव्य करत तांबे यांच्या परतीचा मार्ग बंद असल्याचाच इशारा एकप्रकारे पटोलेंनी तांबेंना दिला आहे.

Nana Patole
Sanjay Raut : हा नियम फक्त विरोधकांसाठीच आहे का ? खेरांवरील कारवाईनंतर राऊतांचा भाजपला सवाल

आघाडी नाहीतर स्वबळावर...

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महाविकास आघाडी नसेल. ती निवडणूक आम्ही स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला आहे असं वक्तव्यही पटोले यांनी केलं आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडी तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत कार्यकर्त्यांचा बळावर निर्णय घेणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे.

थोरातांसोबतच्या वादांनंतर प्रदेशाध्यक्षपदावर टांगती तलवार

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्यातला वाद विकोपाला गेला होता. बाळासाहेब थोरात यांनी काँग्रेस पक्षश्रेष्ठींना पत्र लिहून प्रदेशाध्यक्षांसोबत आपल्याला काम करणं शक्य नसल्याची माहिती समोर आली होती. तसेच विधानपरिषद निवडणुकीदरम्यान झालेल्या पक्षीय राजकारणामुळे व्यथित झाल्याची प्रतिक्रिया बाळासाहेब थोरात यांनी दिली आहे. यानंतर काँग्रेसमधील काही नेत्यांनीही पटोले यांच्या प्रदेशाध्यक्षपद व त्यांच्या कार्यपध्दतीवर टीका केली होती.

कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी विधीमंडळ नेतेपदाचा राजीनामा दिल्यानंतर महाराष्ट्र कॉंग्रेसमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आले होते. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यासोबत झालेल्या वाद मिटवण्यासाठी काँग्रेस प्रभारी एच के पाटीलयांनी थोरातांची भेट घेऊन सविस्तर चर्चाही केली होती.

Nana Patole
Eknath Shinde News : मुख्यमंत्री म्हणाले मी थकतच नाही, रात्री बारा वाजता हाॅटेलचे उद्घाटन..

नाशिक पदवीधर निवडणुकीत सत्यजित तांबे यांनी काँग्रेसमधून बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला होता.त्यानंतर पटोले आणि तांबे यांच्यात वादाची ठिणगी पडली. आरोप प्रत्यारोपांनी काँग्रेसमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला. बाळासाहेब थोरात यांनीही तांबे कुटुंबाची बाजू घेत पटोलेंबाबत उघडउघड नाराजी व्यक्त करत थेट काँग्रेस हायकमांडला पत्र लिहिलं. यानंतर थोरातांच्या मनधरणी करण्यात आली. पण नाना पटोले यांच्या प्रदेशाध्यक्षपद जाणार अशी दबक्या आवाजात चर्चा काँग्रेसहसह राजकीय वर्तुळात आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com