Nana Patole News : 'सत्यजीत तांबे गेले, मी पन्नास आमदार आणीन....'

साम वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांना नाशिक पदवीधर निवडणुकीदरम्यान घडलेल्या घडामोडींवर भाष्य केलं आहे.
Nana Patole News
Nana Patole News Sarkarnama

प्राची कुलकर्णी

Nana Patole Latest news : नाशिक पदवीधर पोटनिवडणुकीच्या काळात राज्याच्या राजकीय वर्तुळात मोठ्या नाट्यमय घडामोडी घडल्या. सत्यजीत तांबे यांची अपक्ष उमेदवारी, त्यानंतर झालेली निवडणूक, त्यादरम्यान घडलेल्या घडामोडी अद्यापही ताज्या आहेत. या निवडणुकीत सत्यजीत तांबे विजयी झाले खरं पण ते कॉंग्रेसमध्ये राहणार की भाजपमध्ये जाणार, हे अद्याप निश्चित झालेले नाही. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाष्य केलं आहे.

साम वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांना नाशिक पदवीधर निवडणुकीदरम्यान घडलेल्या घडामोडींवर भाष्य केलं आहे. ''आमचा एक गेला, मी ५० आणणार. बघा मी कसा खेळ खेळतो. एक व्यक्ती गेला म्हणून विचार संपला, असं होत नाही. शुभांगी पाटील यांनी ४३ हजार मत घेतली. काँगेसचा विचार पुन्हा उभा करणं हा माझा मानस आहे. एक व्यक्ती गेला म्हणून काँग्रेस संपत नाही. नाना पटोले आहे, म्हणून काँग्रेस आहे, असंही मी मानत नाही. मी गेलो की काँग्रेस संपली असं ते मानात असतील तर ते चूक आहे. असं नाना पटोले यांनी म्हटलं आहे.

Nana Patole News
Supriya Sule News: भाजपनं फडणवीसांना मुख्यमंत्री का नाही केलं? सुप्रिया सुळेंचा सवाल

गेल्या महिन्यात राज्यात शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुका पार पडल्या. यात नाशिक पदवीधर मतदारसंघासाठी काँग्रेसकडून डॉ. सुधीर तांबे यांना उमेदवारीची अधिकृत घोषणा झाली होती. पण ऐनवेळी त्यांनी आपला उमेदवारी अर्ज न भरता त्यांचे चिंरजीव सत्यजीत तांबे (Satyajit Tambe) यांनी आपला अपक्ष उमेदवारी अर्ज भरला. त्यामुळे काँग्रेसमध्ये एकच खळबळ उडाली होती. या निवडणुकीत सत्यजीत तांबे विजयी झाले पण त्यादरम्यान घडलेल्या घडामोडींमुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले होते.

सत्यजीत तांबे यांना भाजपचा छुपा पाठिंबा असल्याच्या चर्चाही मतदारसंघासह राजकीय वर्तुळात सुरु होत्या. तर दुसरीकडे, धुळ्याच्या शुभांगी पाटील यांनां भाजपने त्यांना उमेदवारी न दिल्यामुळे त्यांनी शिवसेनेकडे साकडे घातले. महाविकास आघाडीने शुभांगी पाटलांना महाविकास आघाडीने अधिकृत पाठिंबा जाहीर केला. तर इकडे भाजपने तांबेंना अधिकृत पाठिंबा जाहीर न करता ऐनवेळी स्थानिक पातळीवर कार्यकर्त्यांच्या माध्यामातून तांबेना मदत करण्याचे आवाहन केले.

Nana Patole News
Shrikant Shinde News : अखेर श्रीकांत शिंदेंनी मौन सोडलं; म्हणाले,''महाराष्ट्राला राऊतांची गरज,कारण...''

त्यानंतर शिंदे गटानेही यात उडी घेतली होती. यामुळे सत्यजीत तांबेंच्या विजयात भाजपने देखील महत्वाची भूमिका बजावलेली दिसते. कारण जर एका अपक्ष उमेदवाराने महाविकास आघाडीच्या उमेदवाराला पराभूत केलं तर 'अपक्ष उमेदवाराने महाविकास आघाडीचा पराभव केला, असे चित्र तयार व्हावे, असे चित्र राज्यभर तयार होईल, असा भजापचा प्रयत्न असावा, त्यानंतर झालेल्आ निवडणुकीत सत्यजीत तांबेचा विजय झाला आणि शुभांगी पाटील यांचा पराभव झाला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com