Shirur Lok Sabha Constituency : शिरुर लोकसभेसाठी कोल्हे की लांडे ? ; खुद्द शरद पवारांनी जाहीर केला उमेदवार

Shirur Lok Sabha constituency : राष्ट्रवादीकडून कोण उमेदवार असणार याबाबत सगळ्यांनाच उत्सुकता होती.
Sharad Pawar
Sharad PawarSarkarnama

Shirur Lok Sabha constituency candidates announced : शिरुर लोकसभा मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार कोण असेल, अशी चर्चा काही दिवसापासून सुरु होती. या चर्चेला आज पूर्णविराम मिळाला.

विद्यमान खासदार डाँ. अमोल कोल्हे यांच्या उमेदवारीबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात होते, तर दुसरीकडे विलास लांडे यांनी शिरुर लोकसभेसाठी आपण इच्छुक असल्याचे सांगितले. यामुळे शिरुर लोकसभेसाठी राष्ट्रवादीकडून कोण उमेदवार असणार याबाबत सगळ्यांनाच उत्सुकता होती.

आठ लोकसभा मतदार संघातील निवडणुकीबाबत आज पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसची आढावा बैठक झाली. या बैठकीत डाँ. अमोल कोल्हे , विलास लांडे यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

Sharad Pawar
Maval Crime : मावळातील तिसऱ्या खूनाचाही झाला उलगडा,पत्नीनेच केला गेम

यावेळी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी शिरुर लोकसभेच्या उमेदवाराची घोषणा केली. त्यामुळे लांडे कि कोल्हे या वादावर पडदा पडला आहे. मागील काही दिवसांपासून खासदार अमोल कोल्हे यांच्या शिरुर मतदारसंघाची चर्चा राज्यात सुरु होती

मी फक्त इच्छा व्यक्त केली होती : लांडे

"विद्यमान खासदार डाँ. अमोल कोल्हे हेच शिरुरमधून लोकसभा लढवतील," असे शरद पवार यांनी जाहीर केले. त्यानंतर "निवडणूक लढविण्यासाठी मी फक्त इच्छा व्यक्त केली होती, पवार साहेबांनी घेतलेला निर्णय मला मान्य आहे," असे विलास लांडे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

" शरद पवार आणि अजित पवार हे जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असणार आहे. त्याच्या पाठीशी आम्ही उभे राहणार अजून वर्ष बाकी आहे. त्यामुळे मी कुठून निवडणूक लढवायची याबाबत अजून कुठेही स्पष्ट झालेले नाही, मात्र पक्षाची जबाबदारी दिली ती मी पार पाडेन. अमोल कोल्हे यांनी आता वर्षभरात त्यांचा जनसंपर्क वाढवावा आणि निवडणुकीला लोकांसमोर जावे," असे लांडे म्हणाले.

विधानसभा आणि लोकसभा निवडणुका एकत्र होणार असल्याची चर्चा आहे.राष्ट्रवादीकडून लढवण्यात येत असलेल्या शिरुर, नगर दक्षिण, अमरावती यासारख्या मतदारसंघांचा यात आढावा घेतला जाणार आहे. या मतदारसंघातील पक्षाचे आजी, माजी आमदार, खासदार, पक्षाचे पदाधिकारी आणि इच्छूक या बैठकीला उपस्थित आहेत.

Sharad Pawar
NCP Meeting IN Pune : अजितदादांनी कार्यकर्त्यांना दम भरला ; तिकीटावरुन भांडलात तर कानाखाली आवाज काढेन..

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, विरोधी पक्षनेते अजित पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्यासह राष्ट्रवादीचे अन्य नेतेही या बैठकीला उपस्थित आहेत.

विरोधीपक्ष अजित पवार यांनी आजच्या बैठकीत कार्यक्रर्त्यांचा चांगलाच समाचार घेतला. बैठकीत अजितदादांनी जोरदार फटकेबाजी करीत पदाधिकारी, कार्यकर्त्यांना सज्जड दम भरला. " उमेदवारीच्या तिकीटावरुन वाद नको, त्यावरुन भांडलात तर याद राखा," अशा शब्दात अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना खडसावलं.

महाविकास आघाडीकडून लोकसभा निवडणुकीच्या तयारीला सुरुवात करण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वी शरद पवार यांनी जागा वाटपाच्या पार्श्वभूमीवर मविआची एक बैठक बोलावली होती. या बैठकीला महाविकास आघाडीचे सर्व प्रमुख नेते उपस्थित होते.

(Edited By : Mangesh Mahale)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com