Gulabrao Patil News : तुम्हाला मी पक्षात नको असेल तर तसे सांगा ; गुलाबराव पाटलांनी कार्यकर्त्यांना..

Gulabrao Patil advice to party workers : भांडणामुळे आपल्या पक्षाचे नुकसान होणार आहे.
Gulabrao Patil
Gulabrao PatilSarkarnama

Gulabrao Patil advice to party workers : जळगाव जिल्ह्यात शिवसेनेत (शिंदे गट) अंतर्गत वाद असल्याची चर्चा आहे. हे वाद कधी चव्हाट्यावर येतात. हे वाद संपविण्यासाठी शिवसेनेच्या चिंतन बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी संपूर्ण जिल्ह्यातील शिवसैनिक पदाधिकारी व कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित होते. जळगाव शहरातील अजिंठा विश्रामगृह येथे ही बैठक झाली.

यावेळी शिवसेनेचे नेते, पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी कार्यकर्त्यांचे कान टोचले. 'येत्या निवडणुकांमध्ये आपापसात न भांडता निवडणुकांना सामोरे जा आणि जिल्ह्यावर भगवा फडकवा," अशा सूचना पक्षातील पदाधिकाऱ्यांना व कार्यकर्त्यांना दिल्या आहेत.

Gulabrao Patil
Sadabhau Khot Demanded Two Seats : सदाभाऊ खोत भाजपचं टेन्शन वाढणार ; 'या' दोन जागांवर केला दावा

गुलाबराव पाटील म्हणाले, "आपल्याला आपणच पाडू शकतो. आपल्याला हरवण्याची ताकद कोणत्याच मायेच्या लालमध्ये नाही. आपापसातल्या भांडणामुळे आपल्या पक्षाचे नुकसान होणार आहे. हे लक्षात ठेवून आपण सगळ्यांनी एकत्र येऊन त्या निवडणुकांसाठी कामाला लागलं पाहिजे,"

"तुम्ही जे सांगणार ते मी करायला तयार आहे. तुम्ही सांगण्याप्रमाणे मी वागतो आहे. तरीदेखील तुम्ही आपापसात भांडत आहात. अशावेळी याचा फटका हा पक्षाला बसतोय. येत्या काळात आपापले मतभेद बाजूला ठेवून निवडणुकीला सामोरे जा आपल्याला थांबवणारा संपूर्ण जिल्ह्यात कोणीच नाहीये," असे मंत्री गुलाबराव पाटील यांनी कार्यकर्त्यांना सांगितले.

Gulabrao Patil
Ajit Pawar News : पवारांनी ठाकरेंना स्पष्टचं सांगितलं, "आंबेडकरांसोबत जमवून घ्या, आम्ही तुमच्या सोबत.."

"आपण आता सत्तेत आहोत. संपूर्ण जिल्ह्याला भरघोस निधी आपल्या माध्यमातून दिला जातोय. वैद्यकीय सेवा या नागरिकांपर्यंत पुरवल्या जात आहेत. माझा तुमच्यावर विश्वास आहे. जर तुम्ही विश्वासघात करत असाल तर तुम्ही स्वतःचाही विश्वासघात करत आहात. हे लक्षात ठेवा उद्या जर तुम्हाला गुलाबराव पाटील हे नावच पक्षात नको असेल तर तसेही सांगा," असे गुलाबराव म्हणाले.

"पक्षात राहूनही कित्येक जण पक्षाचा शंभर टक्के काम करत नाहीयेत. पक्षांमध्ये तुम्ही पगारी नसून तुम्ही स्वच्छेने पक्षाचं काम करीत आहात. अशा वेळी जर तुम्हाला पक्षाचे नेतृत्व आणि पक्षाचे विचार हे मान्य नसतील तर तुम्हाला कोणीही थांबवलेलं नाहीये," असा शब्दात गुलाबराव पाटलांनी नाराजी व्यक्त केली.

(Edited By : Mangesh Mahale)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com