Sharad Pawar News: पंतप्रधानपदाच्या दाव्याबाबत पवारांचं रोखठोक विधान,म्हणाले, ''तुम्ही काहीही विचारा,पण...''

Maharashtra Politics : ''...पण या वयाप्रमाणे हा शब्द परत घ्या!''
Sharad Pawar News
Sharad Pawar NewsSarkarnama

Pune : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे महाराष्ट्राच्या राजकारणात नेहमीच केंद्रस्थानी राहणारं नाव आहे. तसेच ते राष्ट्रीय राजकारणात देखील सक्रीय असतात. सध्या ते मोदी सरकारविरोधात विरोधी पक्षांची मोट बांधण्यात प्रयत्नशील आहेत. पवारांनी आजपर्यंत राज्यासह देशाच्या राजकारणात महत्वाच्या पदावर काम करताना आपल्या नेतृत्वाची, कर्तृत्वाची चांगलीच छाप सोडली आहे. याचमुळे त्यांचं नाव पंतप्रधानपदासाठी कायम चर्चेत असतं. पण आता यावर खुद्द पवारांनीच रोखठोक प्रतिक्रिया दिली आहे.

शरद पवार(Sharad Pawar) यांनी पुण्यात पत्रकारांशी विविध विषयांवर संवाद साधला. यावेळी त्यांनी पंतप्रधानपदावर देखील भाष्य केलं. पवार म्हणाले, पहिल्यांदा तुम्हाला सत्य सांगतो.. तुम्ही काहीही विचारा.. पण या वयाप्रमाणे हा शब्द परत घ्या. पंतप्रधानपदाच्या शर्यतीत मी अजिबात नाही. आम्हाला या देशात स्थिर आणि विकासाला प्रोत्साहित करणारे नेतृत्व हवे आहे. उद्या जनतेने उत्तम प्रकारची साथ दिली त्यातून असे नेतृत्व काढू. अशानेत्यांना पूर्ण साथ देणे आणि मदत देणे ही माझ्यासारख्याची जबाबदारी आहे असल्याचं पवार यावेळी म्हणाले.

Sharad Pawar News
Rajasthan News : सचिन पायलटांचा अल्टीमेटम् काँग्रेसने साफ धुडकावला; खर्गे-गहलोत दिल्लीत बैठक !

''एखाद्या लहरी माणसाने निर्णय घ्यावे...''

दोन हजारांच्या नोटबंदीसंदर्भात एखाद्या लहरी माणसाने निर्णय घ्यावे अशाप्रकारचे निर्णय घेतले जात आहेत. यापूर्वीही अशाप्रकारचा निर्णय घेतल्यानं लोकांचं प्रचंड नुकसान झालं. पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत कोट्यावधी रक्कम होती, जी बदलून दिली नाही. त्यातून बँकेचे आर्थिक नुकसान झाले. निर्णय घेतल्यानंतर ज्यांच्या जास्त गुंतवणूक आहे.

त्यांना बदल करायचा आहे, जबाबदारी पाळायची नाही. आणि आम्ही काही वेगळे करतोय असं दाखवायचं. त्यांच्या नोटबंदीच्या निर्णयानं देशात चमत्कार केवळ इतकाच झाला की, अनेकांनी आत्महत्या केली. अनेक कुटुंब, अनेक व्यावसायिक हे उद्धवस्त झाले. तो चमत्कार पुरेसा नाही म्हणून हा दुसरा चमत्कार केला आहे असा टोलाही मोदी सरकार(Modi Government)ला पवारांनी यावेळी लगावला.

Sharad Pawar News
Breaking ! मुंबईत ब्लास्ट करणार; मुंबई पोलिसांना धमकी

...त्याची किंमत मलिकांना मोजावी लागली!

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते नवाब मलिक(Nawab Malik) यांना त्रास देण्यात आला. तसेच सातत्याने ते चुकीच्या गोष्टींची भूमिका माध्यमांसमोर मांडत होते. त्याची किंमत त्यांना मोजावी लागली. पण किंमत मोजत असताना ज्यांच्यासंदर्भात भूमिका घेतली होती, त्या लोकांबद्दल काही कारवाई करण्याचा निर्णय देशातील मोठ्या संस्थेला म्हणजेच सीबीआयला घ्यावा लागला याचा अर्थ मलिक यांची भूमिका किती सत्यावर आधारित होती हे स्पष्ट झालं असल्याचीही टिप्पणीही पवारांनी यावेळी केली.

...हे तपासायची वेळ आली

रा्ज्यात मागील काही दिवसांपासून घडत असलेल्या हिंसाचारावर भाष्य केलं. पवार म्हणाले, राज्यातील हिंसक वळणामागील शक्ती कोणती आहे, त्यामागील विचारधारा कोणती आहे हे पाहिले तर आज ज्यांच्या हाती देशाची आणि राज्याची सत्ता आहे त्यांचा यामध्ये कितपत सहभाग आहे हे तपासायची वेळ नक्की आली असल्याचंही पवारांनी सांगितले.

Sharad Pawar News
Raut VS Rane : ''राऊत आतापर्यंत चारवेळा खासदार, तेही एकाच पक्षातून; तुम्ही...!''; ठाकरे गटाच्या नेत्यानं राणेंना फटकारलं

जागावाटपाबाबत अद्याप चर्चाच नाही...

महाविकास आघाडीतील मित्रपक्षांच्या झालेल्या बैठकीत कोणत्याही प्रकारच्या जागावाटपाची चर्चा झालेली नाही. माध्यमांमध्ये सुरु असलेल्या बातम्यांमध्ये कोणतेही तथ्य नाही. मुंबईच्या महानगरपालिकेत कसे जावे याची चर्चा आमच्यात होणार आहे. यामध्ये काही लोकांचे मत आहे की काँग्रेसने स्वतंत्र लढावे, इतरांनी स्वतंत्र लढावे मात्र यामध्ये काही वेगवेगळी मत आहेत. यावरही काही निर्णय झालेला नाही.

राहूल गांधी यांनी काढलेल्या पदयात्रेचा जनमानसात झालेला परिणाम याचे एक उदाहरण आपल्याला कर्नाटकमध्ये पाहायला मिळाले. अशाप्रकारे लोक राहूल गांधी आणि त्यांच्यासोबतच्या सहकाऱ्यांना शक्ती देतील याची मला खात्री आहे.

(Edited By Deepak Kulkarni)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com