Sharad Pawar Statement: कर्नाटकच्या निकालामुळे आगामी निवडणुका...; शरद पवारांचं मोठं विधान

NCP News: "दोन हजारांच्या नोटा बंद करण्याचा निर्णय हा लहरी माणसाने निर्णय घ्यावा, अशा प्रकारातील..."
Sharad Pawar
Sharad PawarSarkarnama

Pune News: "कर्नाटकच्या विधानसभा निवडणुकीत लागलेल्या निकालामुळे आगामी निवडणुका लांबणीवर पडू शकतात", असं मोठं विधान राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलं आहे. ते आज पुण्यात पत्रकार परिषदेत बोलत होते.

जयंत पाटील यांच्या इडी चौकशीच्या पार्श्वभूमीवर बोलताना सरकारी यंत्रणांचा गैरवापर होत असल्याचा आरोपही शरद पवार यांनी यावेळी केला.

पवार म्हणाले, "दोन हजारांच्या नोटा बंद करण्याचा निर्णय हा लहरी माणसाने निर्णय घ्यावा, अशा प्रकारातील आहे. जयंत पाटील यांची ईडी चौकशी करण्यात येत आहे. सध्या देशातील तपास यंत्रणांचा गैरवापर सुरू आहे. राष्ट्रवादीच्या दहा नेत्यांची चौकशी करण्यात आली. पण त्यातून काही निष्पन्न झालं नाही", असंही पवार म्हणाले.

Sharad Pawar
Jayant Patil News : ईडी चौकशीनंतर जयंत पाटलांची पहिली प्रतिक्रिया ; म्हणाले, ''ईडीकडे आता कुठलेही...''

"समीर वानखडे यांच्यावर नवाब मलिकांनी गंभीर आरोप केले होते. त्याची किंमत मलिकांना चुकवावी लागली. अनिल देशमुख यांच्यावर देखील आरोप करण्यात आले होते", असं ते म्हणाले.

"आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीत जागा वाटपाबाबत अद्याप कोणतीही चर्चा झाली नाही. मात्र, आगामी निवडणुका एकत्रित लढविण्याचं निश्चित झालं आहे. याबाबत आम्ही आघाडीतील पक्षाचे प्रत्येकी दोन-दोन सदस्य चर्चा करणार आहोत", असं पवार यावेळी म्हणाले.

Edited By : Ganesh Thombare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com