Kasba By-Election Result: कसब्यात तीन दशकांनंतर इतिहास घडला; पोटनिवडणुकीतच भाजपचा गड खालसा

Ravindra Dhangekar News : काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांचा दणदणीत विजय
Ravindra Dhangekar Won
Ravindra Dhangekar WonSarkarnama

Kasba By-Election News : पुण्यातील कसबा विधानसभा मतदार संघात महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी दणदणीत विजय मिळवला आहे. त्यांनी भाजपचे उमेदवार हेमंत रासने यांचा ११ हजार मतांनी पराभव केला.

कसबा विधानसभा मतदारस संघावर अनेक वर्ष भाजपचे वर्चस्व होते. मात्र, तरीही पोटनिवडणुकीमध्ये काँग्रेसला संधी मिळाली होती. १९९१ मध्ये झालेल्या पोटनिवडणुकीत काँग्रेसला येथे संधी मिळाली होती. काँग्रेसच्या (Congress) वसंत थोरात यांनी भाजपचे गिरीष बापट (Girish Bapat) यांचा परवाभव केला होता. आता या पराभवाची पुनरावृत्ती झाली आहे. त्यामुळे कसब्यात ३१ वर्षांनतर त्या इतिहासाची पुनरावृत्ती झाली आहे.

Ravindra Dhangekar Won
Grampanchayat Election : उदय सामंतांचा गड ढासळला; महाविकास आघाडीचा मोठा विजय

कसबा विधानसभा मतदारसंघ अनेक वर्ष भाजपच्या (BJP) ताब्यात होता. तो आता काँग्रेसने पुन्हा एकदा खेचून आणला आहे. गिरीष बापट येथून पाच वेळा भाजपचे आमदार होते. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत ते पुण्याचे खासदार झाले. त्यामुळे येथे दिवगंत आमदार मुक्ता टिळक (Mukta Tilak) यांना संधी मिळाली होती. मात्र, मुक्ता टिळक यांचे निधन झाल्यामुळे येथे पोटनिवडणूक झाली. त्यामध्ये काँग्रेसने इतिहास घडवला आहे.

बापट यांच्या आधी अण्णा जोशी व त्यांच्याआधी अरविंद लेले यांनी येथून निवडणूक जिंकली होती. मात्र, अण्ण जोशी हे लोकसभेवर निवडून गेल्यानंतर त्यांनी आमदारकीचा राजीनामा दिला होता. त्यामुळे पोटनिवडणूक झाली होती. त्यामध्ये काँग्रेसने विजय मिळवला होता. त्यानंतर आता या निवडणुकीत काँग्रेसचा विजय झाला आहे.

Ravindra Dhangekar Won
Kasba Peth Result : हक्काच्या प्रभागांमध्ये भाजपची निराशा; हिंदू महासंघाचे अध्यक्ष आनंद दवेंनी घेतली इतकी मते

कसब्याची निवडणूक जाहीर झाल्यापासून येथे महविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्या नावाची जोरदार चर्चा होती. अनेक वर्षापासून हा भाजपचा गड असल्याचे मानले जात होते. हा भाजपच्या गडाला काँग्रेसने खिंडार पाडले आहे. त्यामुळे काँग्रेससाठी हा एतिहासीक विजय आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com