तेवीस गावांच्या समावेशानंतर कशी असेल पुणे शहराची हद्द; जाणून घ्या... - Notification of 23 villages to be included in city of Pune | Politics Marathi News - Sarkarnama

तेवीस गावांच्या समावेशानंतर कशी असेल पुणे शहराची हद्द; जाणून घ्या...

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 30 जून 2021

पुणे शहराचं क्षेत्रफळ 516 चौरस किलोमीटर झालं आहे.

पुणे : पुणे महापालिकेत 23 गावांच्या समावेशाची अधिसूचना आज राज्य शासनाकडून जारी करण्यात आली. त्यामुळे शहराची हद्द वाढली असून चारही बाजूने शहर विस्तारले आहे. पुणे शहराचं क्षेत्रफळ 516 चौरस किलोमीटर झालं आहे. मागील काही वर्षांपासून पुर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर अशा चारही बाजूंनी शहराची हद्दवाढ होत आहे. अकरा गावांचा समावेश झाल्यानंतरच शहराचा पसारा वाढला होता. आता त्यात आणखी 23 गावांची भर पडल्याने पुणे शहर मुंबईपेक्षा मोठं बनलं आहे. (Notification of 23 villages to be included in city of Pune)

तेवीस गावांचा समावेश झाल्यानं पुणे शहराची हद्द बदली आहे. याबाबत राज्य शासनाने काढलेल्या अधिसुचनेमध्ये माहिती देण्यात आली आहे. पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर अशा चारही बाजूंची हद्द अधिसुचनेत नमूद करण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी मंगळवारी केल्यानंतर आज अधिसूचना जारी करण्यात आली आहे. त्यामुळं आता पुणे शहर मुंबईपेक्षा मोठं शहर झालं आहे. मुंबईचं क्षेत्रफळ 460 चौरस किलोमीटर एवढं आहे. 

हेही वाचा : आदित्य ठाकरेंच्या हिरव्यागार लॅाबीची जयंत पाटलांना भुरळ

बैठकीत अजित पवार यांनी महापालिकेतील 23 गावांच्या समावेशाबाबत शिक्कामोर्तब केले. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी गावांच्या समावेशाची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. शासनाचे उप सचिव सतीश मोघे यांच्या सहीने ही अधिसूचना काढण्यात आली आहे. त्यामुळं पुणे महापालिकेची हद्द वाढली असून आता पुणे शहर मुंबईपेक्षा मोठं बनलं आहे. सध्या मुंबई शहराचं क्षेत्रफळ 460 चौरस किलोमीटर एवढं आहे. तर 23 गावांच्या समावेशामुळं पुण्याचं क्षेत्रफळ 516 चौरस किलोमीटरपर्यंत वाढलं आहे.

पुणे शहराची सुधारित हद्द :

1. उत्तरेस : कळस, धानोरी व लोहगाव या गावांची हद्द
2. उत्तर-पूर्व : लोहगाव, वाघोली या गावांची हद्द
3. पूर्वेस : मांजरी बु., शेवाळेवाडी, फुरसुंगी या गावांची हद्द
4. दक्षिण-पूर्व : उरूळी देवाची, होळकरवाडी, औताडे हांडेवाडी या गावांची हद्द
5. दक्षिणेस : धायरी, वडाची वाडी, येवलेवाडी, कोळेवाडी, भिलारेवाडी या गावांची हद्द
6. दक्षिण-पश्चिमेस : नांदेड, खडकवासला, नांदोशी-सणसनगर, कोपरे या गावांची हद्द
7. पश्चिमेस : कोंढवे-धावडे, बावधन बु., बावधन खुर्द, म्हाळुंगे, सुस या गावांची हद्द
8. पश्चिम-उत्तर :  बाणेर, बालेवाडी या गावांची हद्द व पुणे महापालिकेची जुनी हद्द

पुणे महापालिकेत समाविष्ट झालेली गावे पुढीलप्रमाणे :

1. बावधन बुद्रुक, 2. किरकिटवाडी, 3. पिसोळी, 4. कोंढवे - धावडे,
5. कोपरे, 6. नांदेड, 7. खडकवासला, 8. मांजरी बुद्रुक,
9. नऱ्हे, 10. होळकरवाडी, 11. औताडे-हांडेवाडी, 12. वडाची वाडी,
13. शेवाळेवाडी, 14. नांदोशी, 15. सणसनगर, 16. मांगडेवाडी,
17. भिलारेवाडी, 18. गुजर निंबाळकरवाडी, 19. जांभुळवाडी,
20. कोलेवाडी, 21. वाघोली, 22. म्हाळुंगे, 23 सूस.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख