Pimpri Chinchwad: 'महावितरण'च्या अधिकाऱ्यांना आमदार लांडगेंचा 'शॉक'; थेट फडणवीसांकडून केली कानउघडणी

Pune News: खंडीत वीजपुरवठ्याने आमदार लांडगे वैतागले अन् थेट महावितरणच्या कार्यालयात धडकले, २४ तासांचा दिला अल्टीमेटम
Mahesh Landge
Mahesh LandgeSarkarnama

पिंपरी : कालच्या सोसाट्याच्या वाऱ्यामुळे पिंपरी-चिंचवडमधील वीज गायब झाली. भोसरीच्या काही भागात, तर आज दुपारपर्यंत ती आली नव्हती. त्यामुळे नागरिकांच्या मोठ्या प्रमाणावरील तक्रारी आल्याने आमदार महेश लांडगे यांनी थेट 'महावितरण'चे कार्यालयच गाठले अन् तेथील अधिकाऱ्यांना धारेवर धरले.

२४ तासांत वीजपुरवठा सुरळीत करण्याचा 'अल्टिमेटम' आमदार लांडगेंनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना दिला. अन्यथा, नागरिकांच्या रोषाला सामोरे जाण्यास तयार रहा. त्यांच्या आंदोलनाचे नेतृत्व मी स्वत:करेन, असा इशारा त्यांनी दिला आहे. एवढेच नाही, तर त्यांनी थेट ऊर्जामंत्री तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाच फोन करून भोसरी आणि परिसरातील वीज समस्यांसदर्भात प्रशासन बेजाबदारपणे वागत असल्याची तक्रार केली.

Mahesh Landge
Cabinet Decision: शिंदे-फडणवीस सरकारचा शेतकऱ्यांना मोठा दिलासा; राज्य मंत्रिमंडळाचे 12 मोठे निर्णय

महावितरणचे स्थानिक अधिकारी मनमानीपणे कारभार करीत असून, नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे, असे त्यांनी सांगितले. त्यावर फडणवीसांच्या कार्यालयातूनही भोसरी विभागाच्या राज्य वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांची झाडाझडती घेण्यात आली.

भोसरी मतदारसंघातील मोशी, प्राधिकरण, गव्हाणे वस्ती, भोसरी गावठाण, चक्रपाणी वसाहत, इंद्रायणीनगर या भागातील वीजपुरवठा वारंवार खंडीत होत आहे. त्यात काल पुन्हा वीज गेली.

तसेच ती लगेच आली नाही. त्यामुळे आमदार महेश लांडगे यांच्याकडे अनेक भोसरीकरांनी तक्रारी केल्या. त्यावर महावितरणच्या स्थानिक अधिकाऱ्यांना फोन न करता ते स्वत: भोसरी पावर हाऊस येथील महावितरण कार्यालयात धडकले. तेथे त्यांनी तातडीची बैठक घेतली.

Mahesh Landge
Maharashtra Politics: आदित्य ठाकरेंनी मागितली भेटीची वेळ; राज ठाकरेंकडून अद्याप प्रतिसाद नाही, नितेश राणेंचा दावा

महावितरणचे पुणे जिल्ह्याचे अधीक्षक अभियंता सतीश राजदीप, कार्यकारी अभियंता उदय भोसले तसेच दत्ता गव्हाणे, योगेश लोंढे, सम्राट फुगे, शिवराज लांडगे, दिनेश यादव, निखील काळकुटे आदी यावेळी उपस्थित होते. यावेळी आमदार लांडगेंनी संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना धारेवर धरले.

गेल्या दोन वर्षांपासून हेतुपुरस्सर भोसरीकरांसाठी वीज समस्या निर्माण केली जात असल्याचा आरोप त्यांनी केला. अनेकदा विनंती, निवेदने देवूनही महावितरणचे अधिकारी उद्धटपणे उत्तरे देत असल्याने नागरिक हैराण झाले आहेत. यामुळे सर्वसामान्य नागरिकांनी दाद कुणाकडे मागायची?, अशी विचारणा त्यांनी केली. त्यावर अधिकाऱ्यांनी याबाबत सकारात्मक भूमिकेतून कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले.

(Edited By- Ganesh Thombare)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com