Pimpri-Chinchwad : वीजबिल न भरणाऱ्यांना 'महावितरण'चा शॉक; १६ हजार ग्राहकांची वीज खंडित

Pune News : वीज खंडित केलेल्यांना वीज देणाऱ्यांवर होणार फौजदारी
Pimpri-Chinchwad
Pimpri-ChinchwadSarkarnama

पिंपरी : शेकडो कोटी रुपयांच्या थकबाकीमुळे आर्थिक अडचणीत सापडलेल्या राज्य वीज वितरण कंपनी तथा महावितरणने नाईलाजाने पुन्हा थकबाकीदारांचे वीजजोड खंडीत करण्याची कारवाई मोठ्या प्रमाणात सुरु केली आहे.

यामध्ये आतापर्यंत पुणे सर्कलमधील १६ हजार ४१३ ग्राहकांना त्यांनी हा शॉक दिला आहे. तर अशा आणखी ७१ हजार ९८ ग्राहकांचीही बत्ती ते खंडित करणार आहेत.

पुणे ग्रामीण आणि पिंपरी-चिंचवडच्या तुलनेत पुणे शहरातील वीजग्राहक अधिक थकबाकीदार आहेत. त्यात तीन महिन्यांचे वीजबिल न भरलेल्या १६ हजार ४१३ ग्राहकांची बत्ती खंडित करण्यात आली आहे.

त्यात ६ हजार ५३६ ग्राहक हे पुणे शहर, तीन हजार २०९ हे पिंपरी-चिंचवडमधील आहेत. तर, पुणे ग्रामीण म्हणजे आंबेगाव, जुन्नर, मावळ, खेड, मुळशी, वेल्हे, हवेली तालुक्यांतील ६ हजार ६६९ थकबाकीदार ग्राहकांची बत्ती गूल करण्यात आली आहे.

Pimpri-Chinchwad
NCP news Nashik : आमदारांचे स्टिकर लावून होणारे गैरप्रकार थांबणार केव्हा?

असे आणखी ७१ हजार ९८ ग्राहक रडारवर आहेत. या ८७ हजार ५११ थकबाकीदारांकडे ४२ कोटी ६३ लाख रुपये वीजबिल थकित आहे. दरम्यान, वीजजोड खंडित केलेल्यांना त्यांच्या शेजाऱ्यांनी वीज दिली, तर त्यांच्यावर वीजचोरीबद्दल फौजदारी करण्याचा इशाराही महावितरणने दिला आहे. तसेच थकीत वीजबिलांचा ताबडतोब भरणा करून सहकार्य करावे व वीजपुरवठा खंडित करण्याची कटू कारवाई टाळावी, असे आवाहनही केले आहे.

(Edited By- Ganesh Thombare)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com