Pimpri Chinchwad News: मावळमधील विकासकामे आणि निधीवरून आजी-माजी आमदारांत जुंपली!

Sunil Shelke Vs Bala Bhegade : मावळमधील विकासकामे कुणी केली यावरून भाजप, राष्ट्रवादीमध्ये रंगली श्रेयबाजी...
Bala Bhegde, Sunil Shelke
Bala Bhegde, Sunil ShelkeSarkarnama

Pune (Maval) News : लोकसभेची तयारी सुरु झाल्याने विकासकामांवरून आता श्रेयबाजीची लढाई सर्वत्र सुरु झाली आहे. मावळही लोकसभा मतदारसंघही त्याला अपवाद नाही. मावळसाठी निधी कोणी आणला, कोणी विकासकामे केली, यावरून तेथील राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपमध्ये श्रेयबाजी रंगली आहे. त्यावरून आजी, माजी आमदार सुनील शेळके (Sunil Shelke) आणि बाळा भेगडे (Bala Bhegde) यांच्यात पुन्हा जुंपली आहे. (Latest Marathi News)

Bala Bhegde, Sunil Shelke
Nitesh Karale News : ‘५०० की नोट, मटण की बोट और तेरेकोच वोट’, म्हणून विदर्भाची अवस्था वाईट !

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या केंद्रातील सरकारला नऊ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त सध्या भाजपकडून देशभर मोदी @ ९ ही मोहीम सुरु आहे. त्याअंतर्गत नुकतीच मावळमध्ये केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांचा वडगाव (ता.मावळ,जि.पुणे) येथे मेळावा झाला. त्यात भाजपचे माजी आमदार भेगडे यांनी मावळसाठी आपण आणलेल्या निधीतील कामांची भुमीपूजने व उदघाटने आमदार शेळके करीत असल्याचे विधान केले होते. त्याचा खरपूस समाचार आमदार शेळके यांनी लगेच वडगावातच विविध विकासकामांची भुमीपूजने व उदघाटने केल्यानंतर घेतला.

यामधून या आजी-माजी आमदारांत श्रेयाची लढाई आणि पुन्हा तू,तू-मैं,मैं सुरु झाल्याचे दिसून आले आहे. वडगावचे ग्रामदैवत पोटोबा महाराज मंदिरात समोरासमोर येऊन कोणी किती निधी मावळसाठी आणला, कोणी किती व काय विकासकामे केली ते शपथ घेऊन सांगावे, असे पुन्हा एकवार खुलं आव्हान शेळके यांनी भेगडेंना यानिमित्ताने दिला.

रावसाहेब दानवेंनी टीका केली असती, तर समजू शकलो असतो. पण ज्यांचा मागीलवेळी ९४ हजार मतांनी दणदणीत पराभव जनतेने केला, त्यांच्या टीकेची दखल का घ्यावी, असा जळजळीत हल्लाबल शेळके यांनी भेगडेंवर केला. ज्यांना केंद्रीय मंत्री दानवेंच्या मेळाव्याला तीनशे कार्यकर्ते व पाचशे लोकं जमता करता आली नाहीत, बचत गटांच्या महिलांना आणून तेथे बसवावे लागले, अशांची दखल घेण्याची गरज नाही, असे ते म्हणाले. घाणीत हात घालणार नाही,अशी जळजळीत प्रतिक्रिया त्यांनी दिली.

Bala Bhegde, Sunil Shelke
Ram Satpute's mother Passed Away : भाजप आमदार राम सातपुते यांना मातृशोक; जिजाबाई सातपुते यांचं निधन!

दहा वर्षे आमदार असताना काय केले, अशी उलट विचारणा त्यांनी भेगडेंना केली. मावळची जनता सूज्ञ असून आम्ही काम केले नसेल, तर ती आम्हाला मते देणार नाही आणि केलेले असेल,तर पुन्हा आमच्यापाठी खंबीरपणे उभी राहील,असे ते म्हणाले. टाळ्या घेण्यासाठी त्यांनी (बाळा भेगडे) काल टीका केली,असे टोलाही सुनिल शेळकेंनी लगावला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com