रस्ते, पाणी, क्रिडासंकुल सगळं देतो पण तळेगाव घड्याळावरचं जिंका : सुनिल शेळके म्होरक्या

Ajit Pawar | Sunil Shelke |NCP : सर्व ठिकाणी घड्याळचं चाललं पाहिजे
रस्ते, पाणी, क्रिडासंकुल सगळं देतो पण तळेगाव घड्याळावरचं जिंका : सुनिल शेळके म्होरक्या
Ajit Pawar | Sunil ShelkeSarkarnama

(Ajit Pawar | NCP | Latest News)

पिंपरी : यावेळी आघाडी-बिघाडी नाही तर, तळेगाव-दाभाडे, लोणावळा आणि मावळ फक्त घड्याळावरचं जिंकायचं आहे. सर्व ठिकाणी घड्याळचं चाललं पाहिजे, असा दमचं राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (AJit Pawar) यांनी मावळचे आमदार सुनील शेळके आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) इतर स्थानिक पदाधिकाऱ्यांना दिला. ते तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या नवीन प्रशासकीय इमारतीचे भुमीपूजन आणि मावळमधील १८० कोटी रुपयांच्या इतर कामांच्या भुमीपूजन झाल्यानंतरच्या जाहीर सभेत बोलत होते. (Ajit Pawar | NCP | Latest News)

यावेळी अजित पवार यांनी दिमाखदार सोहळ्याबद्दल आमदार मावळचे सुनील शेळके यांचे तोंडभरून कौतूक केले. मजबूत लोकप्रतिनिधी असा त्यांचा उल्लेख त्यांनी केला. कार्यक्रम करावा, तर सुनीलने करावा, असे ते म्हणाले. त्याचा कार्यक्रम दिमाखदारच असतो, अशी पावती त्यांनी दिली. यावेळी दाभाडे सरदार घराण्यातील व्यक्ती, माजी नगराध्यक्ष कृष्णाजी वारकेंसह अनेकांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. (Ajit Pawar | NCP | Latest News)

पुढे बोलताना अजित पवार यांनी तळेगाव-दाभाडे नगरपरिषदेच्या आगामी निवडणुकीत आघाडी बिघाडी चालणार नाही. घड्याळावरच ती लढवली पाहिजे, असा सज्जड दम पक्षाच्या स्थानिक नेत्यांना दिला. वडगाव-मावळ नगरपरिषद निवडणुकीतही कुणी गडबड करायची नाही. परिवार म्हणून एकत्र रहायचे. सुनील हा तुमचा म्होरक्या असून त्यामागे उभे रहायचे, असा आदेश त्यांनी दिला. तसेच सुनीलमागे मी आणि माझ्यामागे शरद पवारसाहेब आहेत, असेही त्यांनी स्पष्ट केले. लोणावळा नगरपरिषदेतही दोन, पाच सदस्य असं चालणार नाही, तिथेही घड्याळच चाललं पाहिजे, असे ते म्हणाले. (Ajit Pawar | NCP | Latest News)

याशिवाय वडगाव मावळ तालुका पंचायतीतही राष्ट्रवादीची सत्ता आणण्याचा चमत्कार करा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. तळेगावसाठी आंद्रा धरणातून पाणी आणतो. त्याचा डीपीआर करा, निधी देतो. रस्ते करून देतो, क्रीडासंकुल करून देतो. पण, तळेगाव घड्याळावर आलं पाहिजे. नगरपालिका दिली पाहिजे, अशी अपेक्षा अजितदादांनी यावेळी व्यक्त केली. असेच यश मावळात जिल्हा परिषद व तालुका पंचायत निवडणुकीतही (जिल्हा परिषदेच्या सहा,तर पंचायत समितीच्या १२ जागा) दिले,तर महत्वाची पदे देण्याचा शब्द देतो,असे ते म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in