Ajit Pawar News : मराठा आरक्षणाबाबत उद्या सर्वपक्षीय बैठक; अजितदादा म्हणाले, "ओबीसी, कुणबी समाजाला..'

Maharashtra Politics : अजितदादा काय बोलणार, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
Ajit Pawar News:
Ajit Pawar News:Sarkarnama

Pune : राज्य सरकार जोपर्यंत त्यांच्या जीआरमध्ये दुरुस्ती करीत नाही. तोपर्यंत उपोषण सुरूच राहणार असल्याची भूमिका मनोज जरांगे यांनी घेतली आहे. राज्य सरकारच्या वतीने अर्जुन खोतकर हे मनोज जरांगेंशी चर्चा करण्यासाठी जालन्यात गेले होते, पण त्यांच्यासोबतची चर्चा अयशस्वी ठरली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मराठा आरक्षणाच्या उपोषणाबाबत उद्या (सोमवारी) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्वपक्षीय बैठक आयोजित केली असल्याचे सांगितले.

अजितदादांची आज (रविवारी) कोल्हापुरात सभा आहे. या सभेपूर्वी पुण्यात राष्ट्रवादीतर्फे रोड शो काढण्यात आला. त्यावेळी ते माध्यमांशी बोलत होते. अजितदादा म्हणाले, "राज्य सरकारकडून अर्जुन खोतकर यांनी मनोज जरांगे पाटलांची भेट घेतली. त्यांना समजून सांगण्याचा प्रयत्न करण्यात आला, पण अद्याप यावर तोडगा निघाला नाही. या विषयावर विरोधी पक्षांचे मत जाणून घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी बैठक बोलवली आहे. ओबीसी, कुणबी समाजाला न दुखवता मराठा समाजाला आरक्षण कसे देता येईल, याबाबत बैठकीत चर्चा होणार आहे,"

Ajit Pawar News:
Gopichand Padalkar News : पडळकर विखेंना म्हणाले, 'भंडाऱ्याला आशीर्वाद समजा' ; आंदोलकांनी त्याचा वापर...

तपोवन मैदानात आज अजित पवारांची सभा होत आहे. सभेसाठी जिल्ह्यातील नेत्यांसह मंत्रीही उपस्थित राहणार आहेत. दुपारी साडेतीन वाजता कोल्हापूर शहरातील कावळा नाक्यावर त्यांचे आगमन होईल. तेथून मिरवणुकीने तपोवन मैदानात ते यणार आहेत. मिरवणूक मार्गावर स्वागत कमानी उभारण्यात आल्या आहेत.

मंत्री हसन मुश्रीफ यांनी काल (शनिवारी) तपोवन मैदानात जाऊन सभेच्या तयारीची पाहणी केली. शरद पवारांच्या सभेनंतर अजितदादांची कोल्हापुरात सभा होत असल्याने या सभेत अजितदादा काय बोलणार, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

Ajit Pawar News:
G20 Summit News : जगभराच्या प्रमुखांसमोर मोदींनी देशाची करून दिली नवी ओळख; 'इंडिया' नव्हे 'भारत'...

मराठा आंदोलन स्थगित

अजित पवारांच्या कोल्हापूर दौऱ्याला सकल मराठा समाजाकडून कडाडून विरोध करण्यात आला होता. त्यांनी आंदोलनाची हाक दिली होती. या सर्व पार्श्वभूमीवर सकल मराठा समाजाच्या विविध प्रश्नांवर 19 सप्टेंबरपूर्वी मुंबईत बैठक घेण्याचे आश्वासन पालकमंत्री दीपक केसरकर आणि वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिले. बैठकीनंतर आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय मराठा समाजाने घेतला आहे.

Edited By : Mangesh Mahale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com