Maratha Reservation News: संभाजीराजे म्हणतात, ‘जरांगे पाटील यांनी त्यांची तब्येत सांभाळावी’

Sambhajiraje says, Maratha leader Jarange Patil shall take care of health- मराठा आरक्षणावरील उपोषणाबाबत संभाजीराजे यांनी सावध प्रतिक्रिया व्यक्त केली.
Sambhajiraje Chhatrapati
Sambhajiraje ChhatrapatiSarkarnama

Nashik Sambhajiraje News : स्वराज्य पक्षाच्या कार्यक्रमासाठी नाशिकला आलेल्या संभाजीराजे छत्रपती यांनी मराठा आरक्षणावर सावधगिरीने प्रतिक्रिया व्यक्त केली. ते म्हणाले, ‘उपोषणाला बसलेल्या जरांगे पाटील यांनी त्यांची तब्येत सांभाळावी, सहकाऱ्यांचे मत विचारात घ्यावे.’ (Sambhajiraje express his view on Maratha reservation with alertness)

स्वराज्य पक्षाचे प्रमुख संभाजीराजे छत्रपती (Sambhajiraje) यांच्या हस्ते नाशिक (Nashik) येथे पक्षाच्या कार्यालयाचे उद्घाटन झाले. यानंतर तुपसाखरे लॉन्समध्ये पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा मेळावा झाला. या वेळी त्यांनी मराठा (Maratha) आरक्षणावर सावध प्रतिक्रिया दिली.

Sambhajiraje Chhatrapati
Dhule politics : महाराष्ट्रात एकही लव्ह जिहाद प्रकरण नाही, भाजप केवळ राजकारण करते!

या वेळी मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी उपोषणास बसलेले मनोज जरांगे पाटील यांच्यावर बोलताना संभाजीराजे छत्रपती म्हणाले, की भावना व न्याय या दोन्हींचा समेट होणे महत्त्वाचे आहे.

जरांगे पाटील यांनी त्यांची तब्येत सांभाळावी. त्यांच्या सहकाऱ्यांशी बोलून पुढे कसे जाता येईल, याबाबत चर्चा करावी. ते पुढे म्हणाले, राज्य सरकारने आरक्षण देताना टिकणारे आरक्षण दिले पाहिजे, असे ते म्हणाले.

Sambhajiraje Chhatrapati
Pankaja Munde News : माझी नीतिमत्ता लेची-पेची नाही; सत्व-तत्त्व-नमत्व माझं राजकारण; पंकजा मुंडेंनी घेतला विरोधकांचा समाचार

स्वराज्य पक्षाचे उत्तर महाराष्ट्रातील कार्यालय हे सर्वसामान्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी असून, येथे आलेल्या प्रत्येक व्यक्तीच्या चेहऱ्यावर विश्वास निर्माण होईल असे काम होईल, असे ते म्हणाले.

संभाजीराजे छत्रपती म्हणाले, की स्वराज्य पक्षाची संघटना स्थापन झाल्यावर लोकांचा प्रतिसाद मिळाला. इतर राजकीय पक्षांपेक्षा काहीतरी नवीन देण्याची व नवा विचार मांडणारे व्यासपीठ निर्माण झाल्याने त्या व्यासपीठाचे पक्षात रूपांतर करण्याचा निर्णय घेतला.

Sambhajiraje Chhatrapati
Nashik Co-operative News : समाजाला सहकार क्षेत्राविषयी आदर राहिलेला नाही

छत्रपती शिवाजी महाराज यांनी अठरापगड जातींना बरोबर घेऊन स्वराज्याची स्थापना केली. तोच विचार स्वराज्य पक्षाच्या माध्यमातून अमलात आणण्याचे ध्येय डोळ्यांसमोर ठेवून वाटचाल करीत आहोत. स्वराज्य पक्षाच्या माध्यमातून सर्वांचे प्रश्न सोडवायचे आहेत. स्वराज्य भवनातून समाजाचे काम होईल, लोकांचे प्रश्न सोडविले जातील.

राज्य संपर्कप्रमुख करण गायकर, सरचिटणीस धनंजय जाधव, विनोद साबळे, केशव गोसावी, मनोरमा पाटील, गुंडाप्पा देवकर, शिवाजी मोरे, संजय पवार, जिल्हाप्रमुख डॉ. रूपेश नाठे, विजय वाहुळे, गणेश कडू, पुष्पा जगताप आदींनी या वेळी भाषणे केली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in