PMC News : खूशखबर ! पुणे पालिकेच्या समाज विकास विभागातील १६० कर्मचारी कायम सेवेत

Medha Kulkarni : आता १८७ मधील उर्वरित २७ पदे थेट भरणार
PMC
PMCSarkarnama

Pune News : पुणे महापालिकेतील समाज विकास विभागातील मानधन तत्त्वावर काम करणाऱ्या १६० सेवकांना सेवेत कायम करून घेण्याचा निर्णय झाला आहे. हा निर्णय राज्य शासनाने घेतला असून तसा शासकीय आदेश काढण्यात आला आहे. या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. तर १८७ चा आकृतिबंध मंजूर केल्याने उर्वरित पदे थेट भरतीतून भरली जाणार आहेत. (Marathi Latest News)

पुणे महापालिकेने (PMC) समाज विकास विभागाचा हा १८७ जागांचा आकृतिबंध मान्य करावा व मानधन तत्त्वावर काम करणाऱ्या १६० जणांना सेवेत सामावून घ्यावे, असा ठराव जानेवारी २०२० मध्ये केला होता. त्यानंतर या विषयाचा माजी आमदार प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी यांनी पाठपुरावा सुरू केला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचीही भेट घेऊन या प्रस्तावास शासनाने मान्यता द्यावी, अशी मागणी केली. त्यांनी यावर तत्काळ कार्यवाही करण्याचे आदेश नगरविकास (दोन)च्या प्रधान सचिवांना दिले होते. त्यानुसार हा आदेश काढण्यात आला आहे.

PMC
Rahul Narwekar News : राहुल नार्वेकरांचं मोठं विधान; म्हणाले, "मी लवकरच क्रांतीकारी निर्णय..."

या कर्माचाऱ्यांना फायदा

पुणे (Pune) महापालिकेच्या समाज विकास विभागाच्या माध्यमातून विविध योजना, उपक्रम राबविले जातात. त्यामध्ये मागासवर्गीय कल्याणकारी योजना, महिला व बाल कल्याण, युवक कल्याणकारी योजना, दिव्यांग योजना आदींचा समावेश आहे. यासाठी यामध्ये समुपदेशक, समूह संघटिका, कार्यालयीन सहाय्यक, व्यवसाय गट मुख्य मार्गदर्शक, रिसोर्स पर्सन, सेवा केंद्र समन्वयक, संगणक रिसोर्स पर्सन, सेवा केंद्र मुख्य समन्वयक, विरंगुळा केंद्र समन्वयक, स्वच्छता सेवक अशा १० पदांसाठी १८७ जागा आहेत. तेथे १६० जण काम करतात. यांना या निर्णयाचा फायदा झाला आहे.

PMC
Shirur and BJP : 'शिरूर'मध्ये भाजपचं ठरलं? लांडगेंचा दावा अन् मंत्र्याचे दौरे; आढळरावांची वाढली धाकधूक

याबाबत माजी आमदार मेधा कुलकर्णी (Medha Kulkarni) यांनी सांगितले की, "महापालिकेच्या समाज विकास विभागात मानधन तत्त्वावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना कायम सेवेत घेण्याबाबत अनेक वर्ष उलटसुलट पत्रव्यवहार चालू होते. समाजविकास विभाग, सामान्य प्रशासन विभाग, नगरविकास विभाग सकारात्मक असले तरी आदेश निघत नव्हते. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्यानंतर त्यांनी त्वरित कार्यवाही करण्याचे आदेश दिले. त्यानंतर हे प्रकरणा मार्गी लागले."

PMC
Thane News : 'आनंद दिघें'वरुन ठाण्यात शिवसेना राष्ट्रवादी आमने सामने; परांजपेंचा जोरदार पलटवार

पालिकेचे अतिरिक्त आयुक्त रवींद्र बिनवडे म्हणाले, "समाज विकास विभागातील मानधन तत्त्वावर काम करणाऱ्या १६० कर्मचाऱ्यांना सेवेत सामावून घेतले जाईल. तसेच १८७ चा आकृतिबंध मंजूर केल्याने उर्वरित पदे थेट भरतीतून भरली जाणार आहेत."

(Edited by Sunil Dhumal)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com