NCP-Shinde group Politics : नरेश म्हस्केंच्या आरोपांना अजित पवारांचे उत्तर; असल्या आलतू फालतू...

अजित पवार यांनीच महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांना पाडण्याचा प्रयत्न केला होता.
Naresh Mhaske | Ajit Pawar
Naresh Mhaske | Ajit PawarSarkarnama

NCP-Shinde group Politics : माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीच महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांना पाडण्याचा प्रयत्न केला होता. असा आरोप म्हस्के यांनी केला. या आरोपामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. अशातच याबाबत खुद्द अजित पवार (Ajit Pawar) यांना विचारले असता त्यांनी हा आरोप धुडकावून लावत नरेश म्हस्केंना उत्तर दिलं आहे. (Ajit Pawar's reply to Naresh Mhaske's allegations; Such nonsense...)

कोण नरेश म्हस्के,मी त्यांना ओळखत नाही, असं म्हणतच त्यांनी म्हस्केंचे आरोप धुडकावून लावले आहेत.तसेच, असल्या फालतू स्टेटमेंट करणाऱ्यांना मी महत्त्व देत नाही. आम्ही असे घरामध्ये पण वागत नाही. आख्या महाराष्ट्राला माहिती आहे. माझी समोर जी भूमिका असते तीच मागेही कायम असते, असे म्हणत अजित पवार यांनी म्हस्केंच्या आरोपांना उत्तर दिलं आहे. तो (रोहित पवार) आमच्या कुटूंबातला सदस्य आहे. माझा पुतण्या म्हणजेच मुलासारखा आहे. त्याच्याबाबत असं करणंही शक्यच नाही. असंही अजित पवार यांनी म्हटलं आहे.

Naresh Mhaske | Ajit Pawar
Rupali Chakankar News: विदेशातील नोकरीच्या आमीषाने महिलांची फसवणूक; चाकणकरांनी थेट आकडेवारीच जाहीर केली

नरेश म्हस्केंचे आरोप?

जानेवारी महिन्यात झालेल्या महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन(MCA)च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत रोहित पवार उभे होते. यावेळी पवार फॅमिलितील कोणती व्यक्ती रोहित पवार यांना पाडा म्हणून सगळ्यांना निरोप देत होती. त्यामुळे अजित पवारसाहेब, आधी आपल्या घरातलं बघा आणि नंतर मुख्यमंत्र्यांवर टीका करा असं विधान म्हस्के यांनी केलं आहे. यावेळी त्यांनी पवार कुटुंबातच मतभेद असल्याचा दावा केला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com