Shinde Group Leader On Ajit Pawar: अजित पवारांकडून रोहित पवारांच्या पराभवासाठी प्रयत्न; 'या' नेत्याचा खळबळजनक दावा

Maharashtra Politics : आधी मुख्यमंत्री कोण हे यावर पक्षात एकमत करा आणि मग...
Ajit Pawar & Rohit Pawar News
Ajit Pawar & Rohit Pawar News Sarkarnama

Thane News : महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनवर राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांची सदस्य म्हणून निवड झाली. तसेच त्यांची एमसीएच्या अध्यक्षपदीही निवड करण्यात आली. मात्र, ही निवडणूक पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. कारण शिंदे गटाचे नेते व ठाण्याचे महापौर नरेश म्हस्के यांनी महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीवरुन मोठा गौप्यस्फोट केला आहे.

शिंदे गटाचे नेते नरेश म्हस्के यांनी ठाण्यातील एका कार्यक्रमाला उपस्थित होते. यावेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व राज्याचे विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवारां(Ajit Pawar)वर टीका करतानाच धक्कादायक खुलासा केला आहे. यामुळे पुन्हा एकदा राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत रोहित पवारांना पाडण्याचा प्रयत्न खुद्द अजित पवार यांनी केल्याचा आरोप म्हस्के यांनी केला आहे.

Ajit Pawar & Rohit Pawar News
Maharashtra Politics : शिवसेनेच्या माजी आमदाराची शिक्षकाला शिवीगाळ; कथित ऑडिओ व्हायरल

नरेश म्हस्के(Naresh Mhaske) म्हणाले, जानेवारी महिन्यात झालेल्या महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन(MCA)च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत रोहित पवार उभे होते. यावेळी पवार फॅमिलितील कोणती व्यक्ती रोहित पवार यांना पाडा म्हणून सगळ्यांना निरोप देत होती. त्यामुळे अजित पवारसाहेब, आधी आपल्या घरातलं बघा आणि नंतर मुख्यमंत्र्यांवर टीका करा असं विधान म्हस्के यांनी केलं आहे. यावेळी त्यांनी पवार कुटुंबातच मतभेद असल्याचा दावा केला आहे.

Ajit Pawar & Rohit Pawar News
PM Narendra Modi News: गौरवास्पद! मोदींच्या नेतृत्वाचा डंका; भारत ठरला जगातील पाचवा सर्वात मोठा निर्यातदार देश

आधी मुख्यमंत्री कोण हे यावर...

काही दिवसांपूर्वी मुंबईत जयंत पाटील, अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांच्या लागलेल्या भावी मुख्यमंत्रीपदाच्या बॅनरचा संदर्भ देत अजित पवारांवर नरेश म्हस्के यांनी निशाणा साधला आहे. यावेळी त्यांनी अजितदादांचा भावी मुख्यमंत्री म्हणून बॅनर लावला जातो. जयंत पाटील यांचा देखील बॅनर लावला गेला, सुप्रिया सुळे यांचा पण लावला गेला. तीन तीन मुख्यमंत्री करणार आहेत का अशी बोचरी टीका म्हस्के यांनी केली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com