Pune Police: पोटनिवडणुकीच्या धामधुमीतच पोलिसांची मोठी कारवाई; एका रात्रीत तब्बल 521 जणांना अटक

Crime News : 538 गुन्हेगारांविरुद्ध प्रतिबंधात्मक कारवाई
 Pune Police
Pune PoliceSarkarnama

Pune Police News : भाजप आमदार मुक्ता टिळक आणि लक्ष्मण जगताप यांच्या निधनानंतर कसबा, चिंचवड पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. या निवडणुकीत भाजप आणि महाविकास आघाडीकडून जोरदार प्रचार सुरु आहे. याचदरम्यान, आता पुणे पोलिसांनी कसबा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरात मोठी कारवाई केली असून 521 जणांना अटक केली आहे.

पोलीस आयुक्त रितेशकुमार कुमार, सहआयुक्त संदीप कर्णिक यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे पोलिसांनी बुधवारी (दि.१५) विशेष मोहीम राबविली आहे. पोलिसांनी वेगवेगळ्या भागात कारवाई करून 3 हजार 707 गुन्हेगारांची झाडाझडती घेतली आहे. यावेळी गंभीर गुन्ह्यातील तब्बल 521 जणांना अटक करण्यात आली आहे. महाशिवरात्र ,शिवजयंती तसेच कसबा पोटनिवडणुकीच्या धर्तीवर या धडक कारवाई करण्यात आली आहे.

पुणे पोलिसांनी(Pune Police) बुधवारी रात्री ९ ते मध्यरात्री दोन वाजेपर्यंत शहरातील, 544 हॉटेल, लॉजसह पीएमपी बसथांबे, रेल्वेस्थानक, एसटी स्थानक परिसरात तपासणी मोहीम राबवली. यावेळी अनेक ठिकाणी नाकाबंदी करून एक हजार 485 वाहनचालकांची चौकशी करण्यात आली. तसेच 538 गुन्हेगारांविरुद्ध प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे. कारागृहातून जामीन मिळवून बाहेर पडलेल्या आरोपींनी पोलिसांनी नोटिसा बजावल्या आहेत.

 Pune Police
Supreme Court : मोठी बातमी : ठाकरे गटाला दणका ; ७ न्यायमूर्तींच्या घटनापीठाला नकार..

पुणे पोलीस दलाच्या पथकाने तपासणी मोहीम राबवली. गंभीर गुन्ह्यातील 521 गुन्हेगारांना अटक करण्यात आली आहे. तसेच बेकायदा शस्त्र बाळगल्याप्रकरणी पाच जणांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून शस्रसाठा जप्त करण्यात आला. अमली पदार्थ विरोधी पथकाने टांझानियातील एकाकडून 23 लाख 26 हजारांचे कोकेन जप्त केले आहे. अमली पदार्थ विरोधी पथकाने मुंढव्यातील एका हुक्का पार्लरवर छापा टाकला आहे.

 Pune Police
Pune News : महागाईनं जनता त्रस्त; पण पोटनिवडणूक उमेदवारांसाठी स्वस्त; काय आहे कारण?

अतिरिक्त पोलिस आयुक्त राजेंद्र डहाळे, रंजनकुमार शर्मा, रामनाथ पोकळे, उपायुक्त अमोल झेंडे, संदीपसिंह गिल, स्मार्तना पाटील, सुहेल शर्मा नारायण शिरगावकर आदींच्या पथकाने कारवाई केली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com