Pune Police Bharati : पुण्यातील पोलीस भरती प्रक्रियेला स्थगिती; जाणून घ्या, काय आहे कारण?

पुण्यातील शिवाजीनगर पोलीस मुख्यालयात या भरतीची मैदानी चाचणी सुरू आहे.
Pune Police Bharati
Pune Police Bharati Sarkarnama

Pune Police Bharti News : पुण्यातील पोलीस भरती २७ फेब्रुवारी पर्यंत स्थगित करण्यात आली आहे. कसबा पोटनिवडणुकीमुळे १८ ते २७ फेब्रुवारी या कालावधीत होणारी पोलीस भरती प्रक्रिया स्थगित करण्यात आल्याची माहिती आहे.

पुणे पोलीस दलातील पोलीस शिपाई, चालक पदासाठी भरती प्रक्रिया ३ जानेवारीपासून सुरू झाली. पुण्यातील शिवाजीनगर पोलीस मुख्यालयात या भरतीची मैदानी चाचणी सुरू आहे. यासाठी राज्यभरातून मोठ्या संख्येने उमेदवार येत आहे. भरतीला राज्यभरातून मोठ्या प्रमाणात उमेदवार येत आहेत.

Pune Police Bharati
IT Survey on BBC: बीबीसीचे महत्वाचे दस्ताऐवज IT च्या ताब्यात ; ६० तास चौकशी..

पुण्यातील चिंचवड आणि कसबा पेठ या विधानसभा मतदारसंघांच्या पोटनिवडणुक होत आहे. कसबा पोटनिवडणुकीच्या बंदोबस्तामुळे une News) पोलीस भरती २७ फेब्रुवारीपर्यंत स्थगित करण्यात आल्याची माहिती पुणे पोलीस (Pune Police) मुख्यालयाचे उपायुक्त रोहिदास पवार यांनी दिली आहे.

पुण्यातील कसबा पेठ आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणूकीची रणधुमाळी सुरू आहे. येत्या २६ फेब्रुवारीला यासाठी मतदान प्रक्रिया पार पडणार असून २ मार्च २०२३ रोजी मतमोजणी करण्यात येणार आहे. या निवडणुकीत महाविकास आघाडी विरुद्ध भाजप असा सामना रंगला असून या निवडणुकीत कोण बाजी मारणार? याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे. दरम्यान, ही निवडणूक 27 फेब्रुवारीला होणार होती. नंतर त्यात बदल करुन ती एक दिवस आधी म्हणजे २६ फेब्रुवारी अशी करण्यात आली. बारावी परीक्षेच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाचा हा निर्णय घेतला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com