Pradip Kurulkar Case Update : कुरूलकरच्या विरोधात ATS कडून २ हजार पानांचं दोषारोपपत्र; ७ जुलैला निकाल?

Pradip Kurulkar Case Update : कुरूलकरची पॉलिग्राफ आणि सायकोलॉजी चाचणी परवानगीची मागणीही करण्यात आली आहे.
Pradip Kurulkar Case Update :
Pradip Kurulkar Case Update : Sarkarnama

Pune News : डिआरडीचे शास्त्रज्ञ प्रदीप कुरूलकरच्या विरोधात एटीएसकडून (दहशतवादी विरोधी पथक) दोन हजार पानांचं दोषारोपपत्र तयार करण्यात आलं आहे. कुरूलकरची पॉलिग्राफ आणि सायकोलॉजी चाचणी परवानगीची मागणीही करण्यात आली आहे. ही नवीन अपडेट कुरूलकर प्रकरणी समोर येत आहे. (2000 page charge sheet by ATS against Pradip Kurulkar)

Pradip Kurulkar Case Update :
DRDO New Director: 'हनीट्रॅप'मध्ये अडकलेल्या डॉ.कुरुलकरांच्या जागी 'डीआरडीओ'च्या संचालकपदी मकरंद जोशी

डिआरडीओचे शास्त्रज्ञ प्रदीप कुरूलकर सद्या एटीएसच्या अटकेत आहेत. आज कुरूकरविरोधात दोन हजार पानांचं दोषारोपपत्र एटीएसकडून न्यायालयात सादर करण्यात आलं आहे. यात वेगवेगळ्या बाबींचा उल्लेख करण्यात आलेला आहे. आतापर्यंत कुरूलकर प्रकरणी करण्यात आलेल्या तपासणीत अनेक गंभीर मुद्दे समोर आलेले आहेत.

एटीएसने न्यायालयात कुरूलकरांची वेगवेगळ्या चाचण्या करण्याची मागणी करण्यात आलेली आहे. यामध्ये पॉलिग्राफ, सायकोलॉजिकल, व्हाईल क्लिअरिंग चाचणी करणे आवश्यक आहेत, असा न्यायालयात युक्तिवाद करण्यात आला.

Pradip Kurulkar Case Update :
Pradeep Kurulkar Case Update : कुरुलकरांच्या अडचणी वाढणार; 'एटीएस'कडून 'पॉलिग्राफ' टेस्टची मागणी,काय आहे कारण?

याप्रकरणी ७ जुलै रोजी निकाल येण्याची शक्यता आहे. मात्र याबाबत तपास करणारे एटीएसचे प्रभारी यांनीही या चाचण्या करण्याची आवश्यकता असल्याचे न्यायालयाला सांगितले आहे. कारण प्रदीप कुरूलकरांकडून याबाबत काही लपवलं जातंय का? खोटं बोललं जातंय का? याबाबत एटीएसकीडून संशय व्यक्त केला जात आहे. (Latest Marathi News)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com