#SSRSuicide : सीबीआय रियाच्या पॉलिग्राफ चाचणीची मागणी करणार?

गांजा तस्करीप्रकरणी केंद्रीय अंमली पदार्थ विरोधी पथकाने ड्रग्स प्रकरणी गुन्हा दाखल केला होता. त्यात लवकरच रियाची चौकशी होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. याप्रकरणी एनसीबीच्या पथकाने स्थानिक ड्रग्स विक्रेत्यांची धरपकड करण्यात सुरूवात केली आहे. त्यातून काही माहिती एनसीबीच्या हाती लागल्याचे सूत्रांनी सांगितले.
Sushantsinh Rajput and Rhea Chakraborty
Sushantsinh Rajput and Rhea Chakraborty

मुंबई : सुशांतसिंग राजपूत मृत्यूप्रकरणी गेली दोन दिवस रिया चक्रवर्तीची सीबीआय कसुन चौकशी करीत आहे. याप्रकरणी सीबीआयने रियाची पॉलिग्राफ चाचणी करण्याचा विचार करत असून या संदर्भात न्यायालयाची परवानगी घेणार असल्याची माहिती सीबीआय सुत्रांनी दिली.

गेली दोन दिवस सीबीआय रियाची चौकशी करीत आहे. शुक्रवारी रियाची दहा तास चौकशी केली. मात्र तिने तपास अधिका-यांना सहकार्य केले नाही. यामुळे सीबीआयने शनिवारी पुन्हा रियाला चौकशीसाठी बोलविले. त्यानुसार दुपारी दीडच्या सुमारास ती सांताक्रुझ येथील डीआरडीओ गेस्ट हाऊसमध्ये दाखल झाली. तिच्यासह सुशांतचे सीए संदीप श्रीधर यांनाही चौकशीसाठी सीबीआयने बोलावले होते.

या प्रकरणी सीबीआय तिच्या पॉलीग्राफी चाचणीची मागणी न्यायालयाकडे करण्याची शक्‍यता आहे. तर दुसरीकडे रियाने स्वतः तसेच कुटुंबियांना धोका असल्याची तक्रार मुंबई पोलिसांकडे केल्याने, तिला मुंबई पोलिसांनी सुरक्षा पुरविली आहे. सांताक्रूज पोलीस रियाला सुरक्षा देणार आहेत. तिचा जबाब नोंदवण्या करता येताना घरापासून डीआरडीओ गेस्ट हाऊसपर्यंत ही सुरक्षा देण्यस सुरुवात केली आहे. रिया व्यतीरिक्त सुशांतचा मित्र सिद्धार्थ पिठानी, कुक नीरज सिंह, दीपेश सावंत, सॅम्युअल मिरांडा आणि केशव यांची देखील चौकशी केली होती. पण त्यात विशेष माहिती सापडलेली नाही.

एनसीबी लवकरच रियाची चौकशी करणार
गांजा तस्करीप्रकरणी केंद्रीय अंमली पदार्थ विरोधी पथकाने ड्रग्स प्रकरणी गुन्हा दाखल केला होता. त्यात लवकरच रियाची चौकशी होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. याप्रकरणी एनसीबीच्या पथकाने स्थानिक ड्रग्स विक्रेत्यांची धरपकड करण्यात सुरूवात केली आहे. त्यातून काही माहिती एनसीबीच्या हाती लागल्याचे सूत्रांनी सांगितले.    
Edited By - Amit Golwalkar

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com