टोळीयुध्द भडकलं : गुंड राण्या बाणखेलेवर हल्ला...गोळीबारात जागेवर ठार

विनयभंग, खूून, मारहाण, रस्त्यात लुटमार अशा गंभीर स्वरूपाचे गुन्हे राण्या बाणखेलेवर दाखल आहेत.
Goon Ranya Bankhele killed on the spot in firing
Goon Ranya Bankhele killed on the spot in firing

मंचर (जि. पुणे) : मंचर जवळ एकलहरे - सुलतानपूर रस्त्यावर फकीरवाडी (ता. आंबेगाव) येथे रविवारी (ता.१) झालेल्या गोळीबारात सराईत गुन्हेगार ओंकार उर्फ राण्या अण्णासाहेब बाणखेले ठार झाला. दुपारी दोन वाजण्याच्या सुमारा चार जणांनी त्याच्यावर गोळीबार केला असून हा हल्ला टोळीयुध्दातून झाल्याचा संशय पोलिसांना आहे. (Goon Ranya Bankhele killed on the spot in firing)

राण्या बाणखेले (वय २६, रा. पांढरी बाणखेले मळा, मंचर ता.आंबेगाव) हा मंचरमधील सराईत गुन्हेगार आहे. तो ठार झाल्यानंतर मंचरमध्ये एकच खळबळ उडाली आहे. त्याच्यावर हल्ला केलेले चार संशयित आरोपी पळून गेले असून पोलिस त्यांचा शोध घेत आहेत. आरोपींची ओळख अद्याप पटलेली नसून गुन्ह्याचे कारणही समजले नाही. 

विनयभंग, खून, मारहाण, रस्त्यात लुटमार अशा गंभीर स्वरूपाचे गुन्हे राण्या बाणखेलेवर दाखल आहेत. मंचर पोलिस ठाण्यात त्याच्यावर अनेक गुन्ह्यांची नोंद आहे. तो एका गुन्हेगाळी टोळीशी संबंधित असल्याने दुसऱ्या टोळीने हा हल्ला केल्याचा संशय पोलिसांना आहे. 

राण्या बाणखेल व प्रकाश रमेश पगारे (वय २३ बैल बाजार मंचर (ता.आंबेगाव) हे दोघे दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास दुचाकीवरून चालले होते. मंचर जवळ एकलहरे - सुलतानपूर रस्त्यावर फकीरवाडी येथे त्यांची गाडी आल्यानंतर अचानक हल्ला करण्यात आला. या गोळीबारात राण्या जागेवरच ठार झाला. 

खेड विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल लांभाते व पोलीस पथकाने घटनास्थळी भेट दिली आहे. पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख पुण्याहून मंचरला येण्यासाठी निघाले आहेत. देशमुख यांच्याकडून जिल्ह्यातील गुंडगिरीला लगाम घालण्याचा सातत्याने प्रयत्न केला जात आहे. पण रविवारी भरदिवसा झालेल्या हल्ल्यामुळं पोलिसांसमोर टोळीयुद्धाचे आव्हान उभे राहिले आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com