काँग्रेसला मोठा धक्का : मुख्यमंत्रीपदाचा दावेदार असलेला बडा नेता भाजपमध्ये

देशात पुढीलवर्षी काही राज्यांमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसमधील अनेक नेते पक्षाला रामराम ठोकत आहेत.
Former Manipur Congress chief Govindas Konthoujam joins BJP
Former Manipur Congress chief Govindas Konthoujam joins BJP

नवी दिल्ली : देशात पुढीलवर्षी काही राज्यांमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसमधील अनेक नेते पक्षाला रामराम ठोकत आहेत. आता ईशान्य भारतातील राज्यांतूनही काँग्रेस मोठा धक्का बसला आहे. मुख्यमंत्रीपदाचे प्रमुख दावेदार असलेल्या बड्या नेत्याने भाजपमध्ये प्रवेश केला आहे. विशेष म्हणजे मागील निवडणुकीत काँग्रेसला या राज्यात सर्वाधिक जागा मिळून सत्ता मिळवण्यात अपयश आले होते. (Former Manipur Congress chief Govindas Konthoujam joins BJP)

उत्तर प्रदेशातील नेते जतिन प्रसाद यांनी काही दिवसांपूर्वीच भाजपमध्ये प्रवेश केला आहे. राहुल गांधी यांच्या यंग ब्रिगेडमधील हे नेते होते. त्यानंतर आता मणिपुरमधील माजी प्रदेशाध्यक्ष गोविनदास कोंथूजाम यांनीही रविवारी भाजपमध्ये प्रवेश केला. दिल्लीत भाजप मुख्यालयात हा प्रवेश झाला. यावेळी मणिपुरचे मुख्यमंत्री एन. बिरेन सिंह, केंद्रीय प्रभारी संबित पात्रा, खासदार अनिल बलूनी उपस्थित होते. 

मणिपूरमध्येही पुढील वर्षी विधानसभेच्या निवडणुका होणार आहे. त्यामुळं काँग्रेससाठी हा मोठा झटका मानला जात आहे. गोविंनदास यांनी डिसेंबर 2020 मध्येच प्रदेशाध्यक्ष करण्यात आले होते. 2017 मध्ये झालेल्या निवडणुकीत काँग्रेसला सर्वाधिक जागा मिळाल्या होत्या. पण भाजपने इतर पक्षांना हाताशी धरून सत्ता स्थापन करत काँग्रेसचा हातातोंडाशी आलेला घास काढून घेतला होता. 

आगामी निवडणुकीत गोविंनदास हे काँग्रेसकडून मुख्यमंत्रीपदाचे दावेदार मानले जात होते. पण त्यांनी पक्षश्रेष्ठींवर नाराजी व्यक्त करत पदाचा राजीनामा दिला. त्यानंतर रविवारी भाजपमध्ये प्रवेश करत पक्षाला झटका दिला. त्यांनी 21 जुलै रोजी पक्षाच्या सदस्यत्वाचा तर 28 जुलैला आमदारकीचाही राजीनामा दिला आहे. ते विष्णुपूर मतदारसंघाचे आमदार होते. 

गोविंनदास म्हणाले, 'भाजपमध्ये मी पूर्ण क्षमतेने काम करेन. मणिपूरमध्ये पुढील वर्षी होणाऱ्या निवडणुकीत भाजपला बहुमत मिळवून देण्यासाठी मनापासून काम करेन.' गोविंनदास यांच्या राजीनाम्यानंतर काँग्रेसमध्ये खळबळ उडाली. त्यानंतर हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी यांना राज्यातील स्थितीबाबत माहिती देण्यात आली आहे. त्यांच्याकडून लवकरच पुढील दिशा ठरवली जाईल, असे मणिपुर काँग्रेसमधील नेत्यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com