पुण्यातील लाॅकडाऊन कधी संपणार? : अजित पवारांनी दिले हे उत्तर!

पुणे जिल्ह्यात अद्याप रुग्णांची संख्या जास्त असल्याचे मत
ajit pawar11
ajit pawar11

पुणे : पुणे शहरतील (Pune City) परिस्थिती आता काहीशी आटोक्यात आली असली ती जिल्ह्यातील रूग्णसंख्या अजूनही कायम आहे. त्यामुळे लॉकडाऊन संदर्भात येत्या १० दिवसातील परिस्थिती पाहून निर्णय घेण्यात येईल, असे पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी सांगितले.जिल्ह्यात अपेक्षेइतकी संख्या अद्याप कमी झालेली नाही. रूग्णसंख्या कमी होण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र, रूग्णांना आता ऑक्सिजन व व्हेंटिलेटरच्या खाटांची कोणतीही अडचण नसल्याचे पालकमंत्री पवार यांनी स्पष्ट केले. (Ajit Pawar says review on lockdown after 10 days)

पुण्यातील कोरोना स्थितीच्या आढावा बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते. पवार म्हणाले, ‘‘ पुणे शहरातील रूग्णसंख्या गेल्या काही दिवसात कमी होताना दिसत आहे. मात्र, जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील संख्या हवी तितकी कमी होताना दिसत नाही. त्यामुळे लॉकडाऊनच्या संदर्भातील निर्णय लगेच होणार नाही. पुढील दहा दिवसातील परिस्थितीचा अंदाज घेऊन त्यावेळी योग्य तो निर्णय घेण्यात येईल. पुण्यात काळ्या बुरशीमुळे रूग्णालयात दाखल असलेल्या रूग्णांची संख्या तीनशेहून अधिक आहे. पुण्याबाहेरूनही रूग्ण पुण्यात येत आहेत. या आजारावरील वरील उपचारासांठी लागणाऱ्या इंजेक्शनची कमतराता आहे. हा मुद्दा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत झालेल्या बैठकीतही मांडण्यात आला होता.``

रेमडेसिव्हीर इंजेक्शनचा सध्या तुटवडा नाही. मात्र, केंद्र सरकारने या इंजेक्शनचा वापर फार गरज असेल तरच करा असे सांगितले असून प्लाझमाचा वापर पूर्णपणे बंद करायला सांगितले आहे. ऑक्सिजनची निर्मिती करण्यात आघाडी घेतली आहे. प्रत्येक तालुक्यात ऑक्सिजन निर्मितीचे काम सुरू आहे. राज्यात कोरोनची तिसरी लाट येऊ नये म्हणून काळजी घेण्यात येत आहे. मात्र, लाट आलीच तर त्याचा मुकाबला करण्यासाठी आवश्‍यक उपाययोजना करण्यात येत आहेत. त्यासाठी लागणारा निधीदेखील उभा करू, पुरेशा लस साठ्याअभावी लसीकरणाचे काम थंडावले असले तरी भारत बायोटेक व सिरमने अधिक प्रमाणात लस निर्मितीचे काम हाती घेतले आहे.’’

पुण्यात गुंडांच्या अंत्यविधीला मोठ्याप्रमाणात गर्दी झाल्याच्या तक्रारी आल्या आहेत. या संदर्भात संबंधित पोलीस ठाण्यांच्या पाालीस आधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे. मात्र, अशाप्रकारे चुकणाऱ्या पोलीस आधिकाऱ्यांवर कारवाई टाळणाऱ्या वरिष्ठ आधिकाऱ्यांवर कारवाई करण्यास मागे-पुढे पाहिले जाणार नाही, असा इशारा यावेळी पालकमंत्री पवार यांनी दिला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com