रिक्षाचालकांच्या खात्यात दीड हजार रूपये जमा होणार; २२ मेपासून अंमलबजावणी

रिक्षाचालकांना अर्थसहाय्य देण्यासाठी आवश्यक असलेला निधी शासनाकडून उपलब्ध करण्यात आला असून ज्या रिक्षा चालकांचे आधार क्रमांक बँक खात्याशी जुळतील, त्यांच्या संबंधित बँक खात्यात त्यांना एकवेळचे अर्थसहाय्य त्वरित जमा होणार आहे. परिवहन आयुक्त कार्यालयातर्फे ही माहिती देण्यात आली आहे.
One and a half thousand rupees will be deposited in the autorickshaw driver's account; Implementation from 22nd May
One and a half thousand rupees will be deposited in the autorickshaw driver's account; Implementation from 22nd May

सातारा : कोरोना काळात लॉकडाउनमुळे रिक्षा चालकांच्या (Auto Rikshaw Drivers) उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला होता. या रिक्षाचालकांना दिलासा देण्यासाठी शासनाकडे नोंदणी केलेल्या चालकांना महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सरकारने दीड हजार रुपये अनुदान देण्याची घोषणा केली. यासंदर्भातील निर्णय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार (Ajit Pawar) यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत घेण्यात आला होता. या निर्णयाची अंमलबजावणी येत्या शनिवारपासून (दि. २२ मे) सुरु होत आहे. (One and a half thousand rupees will be deposited in the autorickshaw driver's account; Implementation from 22nd May)

यासाठी रिक्षाचालकांना कोणतीही कागदपत्रे सादर करण्याची गरज नाही. रिक्षाचालकांनी ऑनलाईन प्रणालीवर वाहन क्रमांक, अनुज्ञप्ती क्रमांक व आधार क्रमांकांची नोंद केल्यानंतर संगणक प्रणालीवर आपोआप माहितीची पडताळणी होईल. आधार क्रमांकाशी लिंक असलेल्या खात्यात दीड हजारांची मदत तात्काळ जमा केली जाणार आहे. 

रिक्षाचालकांना अर्थसहाय्य देण्यासाठी आवश्यक असलेला निधी शासनाकडून उपलब्ध करण्यात आला असून ज्या रिक्षा चालकांचे आधार क्रमांक बँक खात्याशी जुळतील, त्यांच्या संबंधित बँक खात्यात त्यांना एकवेळचे अर्थसहाय्य त्वरित जमा होणार आहे. परिवहन आयुक्त कार्यालयातर्फे ही माहिती देण्यात आली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com