जगातील सर्वात वाईट कामगीरी करणार नेता कोण; मोदींना मिळाली ९० टक्के मते

अशाच जगभरात कोरोनाचा (Covid-19) सर्वाधिक फटका बसलेल्या देशांमधील नेत्यांसंदर्भात एक ऑनलाईन जनमत चाचणी घेण्यात आली.
Narendra Modi.jpg
Narendra Modi.jpg

नवी दिल्ली : भारतामध्ये कोरोनाच्या (Covid-19) दुसऱ्या लाटेमुळे हाहाकार उडाला आहे. अनेक राज्यांमध्ये आरोग्य सुविधांची कमतरता आहे. कोरोना औषधे, ऑक्सिजन, बेड्स आणि लसींच्या तुटवड्यामुळे (Vaccination) अनेक स्तरांमधून केंद्र सरकारवर टीका केली जात आहे. आंतरराष्ट्रीय प्रसारमाध्यमांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे. (In the global polls Narendra Modi got 90 percent votes)

अशाच जगभरात कोरोनाचा (Covid-19) सर्वाधिक फटका बसलेल्या देशांमधील नेत्यांसंदर्भात एक ऑनलाईन जनमत चाचणी घेण्यात आली.  त्यामध्ये सर्वात वाईट कामगिरी करणारा नेता कोण असा प्रश्न विचारण्यात आला होता. या जनतमचाचणीमध्ये ९० टक्के लोकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना (Narendra Modi) मत दिली आहेत. त्यामुळे कोरोनाचा सर्वाधिक फैलाव झालेल्या देशांमध्ये सर्वात वाईट कामगिरी करणारे सर्वोच्च नेते म्हणून मोदींना सर्वाधिक मते मिळाली आहेत. 

अमेरिकेमधील 'द कॉनव्हर्सेशन' या वेबसाईटने ट्विटरवर घेतलेल्या चाचणीमध्ये, कोरोनाचा सर्वाधिक प्रादुर्भाव झालेल्या देशांपैकी भारताने पंतप्रधान साथरोगाची परिस्थिती हातळ्यात सर्वात सुमार कमागिरी करणारे ठरल्याचे दिसून आले. आम्ही पाच देशांमधील तज्ज्ञांच्या मदतीने त्यांच्या देशातील नेतृत्वाने कोरोना साथ कशापद्धतीने हाताळली यासंदर्भातील आढावा घेतला, असे सांगत द कॉनव्हर्सेशनने जनमत जाणून घेण्यासाठी ट्विटर एक पोल घेतला. 

''सर्वात वाईट कामगिरी कोणी केली?, ट्विटरवर केवळ चारच पर्याय देता येतात. त्यामुळे चार पर्यायांपैकी इतर काही उत्तर असेल तर कमेंट करुन कळवा,'' असे सांगत पोल पोस्ट करण्यात आला होता. या प्रश्नासाठी ब्राझीलचे बोल्सोनारो, भारताचे नरेंद्र मोदी, मॅक्सिकोचे अ‍ॅमलो आणि अमेरिकेचे डोनाल्ड ट्रम्प, (Donald Trump) असे चार पर्याय देण्यात आले होते.

या जणमत चाचणीमध्ये ७५ हजार ४५० जणांनी आपली मते नोंदवली. त्यापैकी सर्वाधिक मते म्हणजे ९० टक्के मते नरेंद्र मोदींना मिळाली. म्हणजेच ७५ हजार ४५० जणांपैकी ६७ हजार ९०५ जणांनी मोदी हे जगामध्ये कोरोना परिस्थिती हातळ्यात सर्वात वाईट कामगिरी करणारे नेते असल्याचे म्हटले. त्या खालोखाल अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांना ५ टक्के तर बोल्सोनारो यांना ३.७ टक्के मते मिळाली. मॅक्सिकोच्या अ‍ॅमलो यांना या पोलमध्ये केवळ १.३ टक्के मते मिळाली. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com