पुणे आणि पिंपरी-चिंचवडची आकडेवारी चिंता कमी करणारी... ग्रामीण भागात अपेक्षित घट नाही....

पुण्यातील लाॅकडाऊन एक जूनपासून शिथिल करण्याची मागणी...
Pune corona
Pune corona

पुणे : पुणे शहर आणि पिंपरी-चिंचवड या दोन प्रमुख शहरांतून कोरोनासाठीची आकडेवारी उत्साहवर्धक असली तरी ग्रामीण भागातील नव्या रुग्णांची संख्या अद्याप म्हणावी तशी कमी झालेली नाही. पुणे शहरात आज केवळ 709 नवीन कोरोना रुग्ण आढळले. पिंपरी-चिंचवडमध्ये 655, ग्रामीण भागातून 1708 आणि कॅन्टोन्मेंट भागातून 18 रुग्ण नव्याने सापडले. पुणे जिल्ह्याचा एकूण आकडा हा 3088 इतका आहे.

पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील लाॅकडाऊन शिथिल करण्याची मागणी त्यामुळे होऊ लागली आहे. व्यापारी संघटनांनी त्यासाठी सरकारकडे पत्रव्यवहार सुरू केला आहे. पालकमंत्री अजित पवार यांनी याबाबत या महिन्याच्या अखेरीसच निर्णय़ होणार असल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे पुढील आठ दिवस आहे तसाच लाॅकडाऊन राहण्याची चिन्हे आहेत. ज्या ठिकाणी नवीन रुग्ण कमी असतील तेथे शिथिलता देण्याचे धोरण आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज स्पष्ट केले.

पुण्यात लसीकरणासाठी 13 हजार डोस

शासनाकडून महापालिकेला उपलब्ध झालेल्या कोव्हीशील्ड लसीच्या साठ्यातून उद्या (सोमवारी) महापालिकेच्या ६५केंद्रांवर ४५ वयाच्या पुढील नागरिकांसाठी लसीकरण केले जाणार आहे.
शनिवारी (ता. २२) महापालिकेला शासनाकडून १३ हजार डोस उपलब्ध झाले आहेत. त्यानुसार आज (रविवारी) महापालिकेने ७० केंद्रांवर लसीकरण सुरू केले होते. गेले दोन दिवस कोव्हीशील्डचे लसीकरण बंद असल्याने केंद्रांवर गर्दी केली होती. प्रत्येकी केंद्रावर १०० डोस उपलब्ध होते, पण नागरिकांनी भरपूर गर्दी केल्याने रांगा लागलेल्या होत्या. महापालिकेकडे सुमारे साडे सहा हजार डोस शिल्लक आहेत, त्यानुसार सोमवारचे नियोजन करण्यात आले असून, ६५ केंद्रांवर प्रत्येकी १०० डोस पुरविण्यात आलेले आहेत, अशी माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली.

असे होणार लसीकरण
- कोव्हीशील्डचा पहिला डोस घेऊन ८४ दिवसांपूर्वी (२८ फेब्रुवारी) घेणाऱ्या नागरिकांना दुसरा डोस मिळेल.
- दुसऱ्या डोससाठी २० टक्के लस उपलब्ध
- पहिल्या डोससाठी आॅनलाइन बुकिंग करणाऱ्यांसाठी ६० टक्के डोस उपलब्ध
- आॅनलाइन बुकिंग सोमवारी सकाळी ८ वाजता सुरू होईल.
- पहिल्या डोससाठी थेट लसीकरण केंद्रांवर जाणारे आरोग्य कर्मचारी, फ्रंट लाईन कर्मचारी व ४५ च्या पुढील नागरिकांसाठी २० टक्के डोस राखीव

...............

पुणे शहरातील आकडेवारी पुढीलप्रमाणे :

- दिवसभरात ७०९ पाझिटिव्ह रुग्णांची वाढ.
- दिवसभरात २३२४ रुग्णांना डिस्चार्ज.
- पुण्यात करोनाबाधीत ६० रुग्णांचा मृत्यू. २१ रूग्ण पुण्याबाहेरील.
- १२९१ क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
- पुण्यात एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या ४६५६२५.
- पुण्यातील ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- १०६७६.
- एकूण मृत्यू -८००७.
-आजपर्यंतचे एकूण डिस्चार्ज ४४६९४२.
- आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी- ९०६६.

......

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com