खबरदार : निर्बंध शिथील करताना अजित पवारांनी पुणेकरांना दिला इशारा

पुणे शहराचा रुग्ण वाढीचा सरासरी साप्ताहिक वेग आता 5 टक्क्यांच्या खाली आला आहे. त्यामुळे दुकानं, हॉटेल, मॉलसाठीचे नियम शिथील करण्यात आले आहेत.
खबरदार : निर्बंध शिथील करताना अजित पवारांनी पुणेकरांना दिला इशारा
Deputy CM Ajit Pawar gives warning to punekars amid unlock

पुणे : रुग्णसंख्या आटोक्यात असल्यानं पुणे व पिंपरी चिंचवड शहरातील लॉकडाऊनचे निर्बंध शिथील करण्याची मागणी होत होती. रविवारी झालेल्या आढावा बैठकीमध्ये हे निर्बंध शिथील करण्यावर शिक्कामोर्तब करण्यात आले. पण जाता जाता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुणेकरांना कडक इशारा दिला आहे. (Deputy CM Ajit Pawar gives warning to punekars amid unlock)

पुणे शहराचा रुग्ण वाढीचा सरासरी साप्ताहिक वेग आता 5 टक्क्यांच्या खाली आला आहे. त्यामुळे दुकानं, हॉटेल, मॉलसाठीचे नियम शिथील करण्यात आले आहेत. त्यानुसार पुण्यात सर्व दुकाने सर्व दिवशी रात्री ८ पर्यंत सुरु राहतील. तसेच हॉटेल आणि रेस्टॉरंट आठवड्यातील सर्व दिवस रात्री दहा पर्यंत सुरु राहणार असल्याचे अजित पवार पत्रकार परिषदेत जाहीर केले. हे नियम सोमवार (ता. ९ ऑगस्ट) पासून लागू होणार आहेत. 

निर्बंध शिथील केल्याची घोषणा करताना अजित पवारांनी पुणेकरांना कडक शब्दांत इशाराही दिला आहे. रुग्णवाढीचा साप्ताहिक वेग म्हणजे चाचण्यांच्या तुलनेत रुग्ण आढळण्याचे प्रमाण सात टक्क्यांच्या पुढे गेल्यास सध्या दिलेल्या सर्व सवलती रद्द केल्या जातील. त्यानंतर पुन्हा कडक निर्बंध लागू केले जातील, असं पवारांनी स्पष्ट केलं. त्यामुळं दुकानदार, दुकानातील कर्मचाऱ्यांनी सतत मास्कचा वापर करावा, असं आवाहनही पवारांनी यावेळी केलं. दुकान व हॉटेलातील प्रत्येक कर्मचाऱ्याने लशीचे दोन्ही डोस घेतलेले असावेत, असं बंधनही त्यांना घालण्यात आले आहे. 

दरम्यान, दुकाने त्यांच्या साप्ताहिक सुट्टी नुसार आठवड्यातून एक दिवस बंद राहतील. कोरोना लशीचे दोन डोस झालेल्यांनाच मॉलमध्ये प्रवेश देण्यात येईल येणार आहे. मॉल राञी 8 पर्यंत सुरु राहणार आहेत, असे पवार यांनी सांगितले. जलतरण तलावासह इतर नजीकचा संपर्क येणाऱ्या क्रिडा प्रकाराणा पुर्वीचेच बंधने असतील. तर इतर सर्व क्रिडा प्रकार यांच्या नियमीत वेळेनुसार सुरु ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे.  

पुणे ग्रामीणला लेवल ४ चे निर्बंध शिथिल करुन तीनचे निर्बंध लागू करण्यात आले आहेत. त्यामुळे ग्रामीण भागात दुकानांना आणि हॅाटेलला 4 वाजेपर्यंतच परवानगी देण्यात आली आहे. दुसऱ्या लाटेतील कोरोना रुग्णाची संख्या कमी झाल्यानंतर काही जिल्ह्यातील निर्बंध हटवण्यात आले होते. मात्र, पुणे, पिंपरी-चिंचवड सहर ११ जिल्ह्यांना कोणताही दिलासा मिळाला नव्हता. त्यामुळे येथील व्यापारी वर्गामध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी होती. आज अजित पवार यांनी पुणे, पिंपरी-चिंचवडला दिलासा दिला आहे.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in