मोठी घडामोड : रावसाहेब दानवेंच्या घरी राज्यातील भाजप खासदारांची बैठक होणार

देवेंद्र फडणवीस रविवारी संध्याकाळी ७ वाजता दिल्लीतदाखल होणार आहेत.
BJP MPs meeting at Raosaheb Danves home in New delhi on Monday
BJP MPs meeting at Raosaheb Danves home in New delhi on Monday

नवी दिल्ली : भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) हे शनिवारी तीन दिवसांच्या दिल्ली भेटीसाठी राजधानीत आले असून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे रविवारी दाखल होत आहेत. तर सोमवारी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्या दिल्लीतील निवासस्थानी रात्री आठ वाजता भाजप खासदारांची बैठक होणार आहे. त्यामुळं पुन्हा एकदा भाजपमधील घडामोडींना वेग आल्याचं दिसतं. (BJP MPs meeting at Raosaheb Danves home in New delhi on Monday) 
 
देवेंद्र फडणवीस रविवारी संध्याकाळी ७ वाजता दिल्लीत  दाखल होणार आहेत. तसेच राज्यातील भाजपचे नेते चंद्रशेखर बावनकुळे,  संजय  कुंटे, श्रीकांत भारतीय आदी नेतेही उपस्थित राहतील. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, नारायण राणे, भारती पवार, कपिल पाटील हे मंत्रीही बैठकीत सहभागी होणार आहे. भाजप नेतृत्व, पक्षाचे महाराष्ट्रातील केंद्रीय मंत्री व खासदार यांच्याशी बैठका व चर्चा हे पाटील यांच्या दिल्ली भेटीचे घोषित कार्यक्रम सांगितले जातात. 

मात्र राज्यात प्रदेशाध्यक्षपदाचा प्रस्तावित बदल, पक्षसंघटनेत व्यापक बदल करणे व राज ठाकरे यांच्या मनसेबरोबरची मुंबई महापालिकेच्या निवडणुकीतील प्रस्तावित घोषित-अघोषित युती हे त्यांच्या अजेंड्यावरील मुख्य विषय असल्याची खात्रीलायक माहिती मिळाली आहे. मुंबईच्या निवडणुकीनंतर प्रस्तावित असलेल्या प्रदेशाध्यक्षपदाच्या बदलामध्ये आमदार आशिष शेलार यांचे नाव स्पर्धेत आघाडीवर आहे. दुसरीकडे पंकडा मुंडे, विनोद तावडे हे देखील दिल्लीत पोहोचले आहेत. 

त्यामुळे खरोखरीच प्रदेशाध्यक्ष बदलाच्या हालचाली सुरू झाल्यात की काय, असे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे संबंधित नेत्यांच्या समर्थकांना आपल्या नेत्याला प्रदेशाध्यक्ष करण्यासाठीच दिल्लीत बोलावून घेतले असावे, असे वाटत आहे. पक्षावर नाराज असल्याची नेहमीच चर्चा असलेल्या पंकजा मुंडे यांच्याकडे मध्य प्रदेशची जबाबदारी आहे. त्यादेखील त्याच निमित्ताने पक्षाध्यक्षांशी संवाद साधणार आहेत. विनोद तावडेंकर हरयानाची जबाबदारी असल्याने ते देखील त्याच कामसााठी आले आहेत.

चंद्रकांत पाटील यांनी शनिवारी पहिल्या दिवशी राज्य प्रभारी सी टी रवी , केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव, भागवत कराड व कपिल पाटील या मंत्र्यांबरोबर गाठीभेटी केल्या. ते रविवारी पक्षाध्यक्ष जे पी नड्डा, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व नारायण राणे यांच्याशी चर्चा करतील. केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्याकडे सोमवारी भाजप मंत्री व खासदारांशी ते जेवणाच्या निमित्ताने चर्चा करतील व रात्री महाराष्ट्र सदनात पुन्हा त्यांच्याशी चर्चा करतील.

या दरम्यान पाटील केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हेही पाटील यांना वेळ देण्याची शक्यता आहे. सोमवारच्या बैठकीवेळी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस व राज्य प्रभारी सी. टी. रवी हेही हेही उपस्थित राहतील अशी माहिती आहे. आपण पंतप्रधानांच्या भेटीसाठीही विनंती केली असल्याचे पाटील यांनी सांगितले. मात्र या दरम्यान केंद्रीय मंत्रिपरिषदेची तीन दिवसीय बैठक व यूपीची धामधूम सुरू असल्याने मोदी त्यांना तत्काळ वेळ देतील का, हाही प्रश्न आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com